Water supply : मुंबई, ठाण्याच्या काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, वाचा सविस्तर

15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी काही काळ काही भागातील पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही महानगरपालिकांकडून देण्यात आली आहे.

Water supply : मुंबई, ठाण्याच्या काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, वाचा सविस्तर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 9:02 PM

मुंबई : 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी काही काळ काही भागातील पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही महानगरपालिकांकडून देण्यात आली आहे.

मुंबईच्या वांद्रे भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पत्रक काढून पाणीपुरवठ्याबाबत माहिती देण्यात आली आहे. वांद्रे विभागात दिनांक 15 आणि 16 डिसेंबर ला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्वमुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम बुधवार 15 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून गुरुवार 16 डिसेंबर 2021 रोजी रात्री 10 वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. यामुळेच यावेळात वांद्रे पश्चिम म्हणजेच विभागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळेच महापालिकेला सहकार्य करण्याचे आणि काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.

ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे महानगरपालिकेच्या पिसे उदंचन केंद्रातील जॅकवेलमधील कचरा, गाळ काढण्यासाठी काही काळ पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच टेमघर शुध्दीकरण केंद्रामधील तसेच शहरातील विविध ठिकाणी तातडीने देखभाल आणि दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार 15 डिसेंबर, २०२1 रोजी सकाळी 9 ते गुरुवार 16 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे बुधवारी 15 डिसेंबर सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ठाणे शहरातील इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, रामनगर, डिफेन्स, किसननगर, घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, आकृती, सिध्देश्वर, जॉन्सन, ईटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच बुधवार रात्री 9 ते गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत ऋतु पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा आणि मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

VIDEO | ‘माझी वसुंधरा अभ्यासक्रम’ शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द, विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार

Ola S1 ते Hero Electric Optima, 1 लाखाहून कमी किंमतीत 4 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

आधुनिक सावकारीचा ‘डिजिटल’ चेहरा; लाखो नागरिक कर्जाच्या जाळ्यात

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.