Omicron Variant Update : टेन्शन वाढलं, आफ्रिकन देशातून आलेल्या मुंबईतील आणखी तीन जणांना कोरोना

आफ्रिकेतील देशांमधून (African Countries) मुंबईत दाखल झालेल्यांपैकी आणखी तीन प्रवाशांना कोरोना (Three People) ससंर्ग झाल्याचे समोर आले आहे.

Omicron Variant Update : टेन्शन वाढलं, आफ्रिकन देशातून आलेल्या मुंबईतील आणखी तीन जणांना कोरोना
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 8:45 AM

मुंबई: आफ्रिकेतील देशांमधून (African Countries) मुंबईत दाखल झालेल्यांपैकी आणखी तीन प्रवाशांना कोरोना (Three People) ससंर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता आफ्रिकन देशातून मुंबईत आलेल्या चार जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. एकूण चार जण कोरोनाबाधित झाले असून यांना मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन (Omicron) विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यानं मुंबईकरांची चिंता वाढलीय. यापूर्वी महाराष्ट्रात आफ्रिकन देशातून प्रवास करुन आलेल्या सहा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.  त्यामध्ये  मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली येथील व्यक्तींचा समावेश होता.

12 नोव्हेंबरपासून 466 प्रवासी मुंबईत

आफ्रिकेसह अन्य जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा शोध पालिकेने सुरू केला असून यात पहिल्या टप्प्यामध्ये 12 नोव्हेंबरपासून आफ्रिकेतून 466 प्रवासी मुंबईत दाखल झाले होते. 15 दिवसांपूर्वी मुंबईत 466 जण आलेत. पैकी 100 जण हे मुंबईतील आहेत. ह्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जातेय. याच चाचणीत डोंबिवलीतल्या रुग्णाचा शोध लागला. संबंधीत रुग्ण हा 40 वर्षांचा आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेचाच रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई महापालिकेकडून बाहेर आलेल्यांचा चाचण्या सुरु

यातील 100 मुंबईत राहणारे असून याच्या कोरोना चाचण्या पालिका करत आहे. अंधेरीत वास्तव्यास असणाऱ्या एका प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मंगळवारी समोर आले आहे. यानंतर बुधवारी आणखी तीन प्रवासी बाधित असल्याचे आढळले आहे.

कुठे किती रुग्ण?

महाराष्ट्रात दक्षिण आफ्रिका कनेक्शन असणारा कोरोनाबाधित असलेला पहिला व्यक्ती  हा डोंबिवलीत (Dombivali Corona case) आढळला. डोंबिवली पाठोपाठ मुंबईलाही हादरले बसले. त्या संबंधीत प्रवाशाची चाचणी झाली. त्याच्या कुटुंबियाचीही झाली. त्यात तो प्रवाशी पॉझिटिव्ह आला. सुदैवानं कुटुंबीय मात्र निगेटीव्ह निघाले. पण त्याच दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले इतर पाच जण मात्र पॉझिटिव्ह निघालेत. त्यात मुंबई, पुणे, भाईंदरमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर पिंपरीच्या दोघा जणांचा समावेश आहे. दरम्यान या सहा जणांना ओमिक्रॉनची लागण झालीय का नाही त्याच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आलेत. जिनोम सिक्वेन्सिंगही करण्यात आलीय. त्याचा रिपोर्ट येणं मात्र बाकी आहे.

इतर बातम्या: 

धाकधूक वाढली! ‘हाय रिस्क’ देशातून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉनच्या चाचणी अहवालाची प्रतिक्षा

Maharashtra Rains and Weather News LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात रात्रभर पावसाची रिपरिप

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.