मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, नितीन गडकरी यांचा नवीन प्रोजेक्ट काय?

नवी मुंबई विमानतळाजवळ ‘जेटी’ची निर्मिती यापूर्वीच झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसराला विशाल समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करुन रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, नितीन गडकरी यांचा नवीन प्रोजेक्ट काय?
water taxi
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 10:44 AM

Mumbai’s transportation network: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणत आहे. काळानुसार त्यांनी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचा चंग बांधला आहे. आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार आहे. त्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. ठाणे येथे झालेल्या एका प्रचारसभेत गडकरी बोलत होते. नवी मुंबई विमानतळ मार्च 2025 पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

वॉटर टॅक्सी सेवा सुरु होणार

वाटर टॅक्सी सेवा जगातील अनेक देशांमध्ये आहे. फ्रॉन्स, न्यूझीलंड, अमेरिकासह अनेक देशात वॉटर टॅक्सीमुळे सार्वजनिक वाहतूक होते. भारतात प्रथम वॉटर टॅक्सी सेवा 2020 मध्ये केरळमध्ये सुरु झाली. नितीन गडकरी म्हणाले, नवी मुंबई विमानतळाजवळ ‘जेटी’ची निर्मिती यापूर्वीच झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसराला विशाल समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करुन रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले.

ठाण्यातील प्रश्न कायम

ठाण्यात आता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न आहे. या ठिकाणी उड्डाण पूल बांधून देखील समस्या कायम आहे. ठाणे, मुंबई, दिल्ली या शहरांची सर्वात मोठी समस्या वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण आहे. मुंबई ठाणे शहराची प्रगती शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत आहे. यामुळे शिक्षण आणि रोजगारासाठी येथे लोंढे वाढत आहे. या भागातच नव्हे सर्वत्र विकास झाला पाहिजे. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाहिजे तसा रोजगार उपलब्ध झाला नाही.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रमध्ये सर्व मोठी उद्योग येत आहेत. 20 हजार कोटींची गुंतवणूक संभाजी नगरमध्ये होत आहे. राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे आहे. परंतु गेल्या ६० वर्षांत काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकास झाला नाही, अशी टीका नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.