Mumbai New Year | अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क, दिंडोशी भागात ड्रिंक अँड ड्राईव्हचे एकही प्रकरण नाही

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, दिंडोशी परिसरात वाहतूक पोलिसांकडूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. येथे नाकाबंदी करण्यात येत असून ड्रिंक अँड ड्राईव्हचे एकही प्रकरण सापडलेले नाही.

Mumbai New Year | अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क, दिंडोशी भागात ड्रिंक अँड ड्राईव्हचे एकही प्रकरण नाही
MUMBAI NEW YEAR
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 9:18 AM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे निर्बंध पाळून नववर्षाचे  स्वागत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पार्ट्यांवर बंदी घालण्यात आलीय. मुंबईमध्ये तर गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. नववर्षानिमित्त पोलिसांकडून नाकांबदी करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, दिंडोशी परिसरात वाहतूक पोलिसांकडू नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला लोकांकडून प्रतिसाद मिळत असून ड्रिंक अँड ड्राईव्हचे एकही प्रकरण दिंडोशी परिसरात सापडलेले नाही.

ड्रिंक आणि ड्राईव्हचे एकही प्रकरण नाही

नव्या वर्षाचे स्वागत करताना अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून नाकाबंदी सुरु आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, दिंडोशी परिसरात वाहतूक पोलीस विशेष सतर्क दिसले. येथे सीट बेल्ट आणि हेल्मेट नसलेल्या अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र आनंदाची बाब म्हणजे नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यान या भागात ड्रिंक आणि ड्राईव्हचे एकही प्रकरण आढळले नाही. पोलिसांनी तशी माहिती दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर लोकांना ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि सुरक्षेबाबत जागरुक केले.

पश्चिम उपनगरात 35 ठिकाणी नाकाबंदी

मुंबई तसे उपनगरात नववर्षानिमित्त चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी पश्चिम उपनगरात 35 ठिकाणी नाकाबंदी केली. त्याप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या वतीने अनोखी भेटदेखील देण्यात आल्या. जे लोक वाहतुकीचे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाईदेखील केली गेली.

मुंबईत पार्टी-सेलिब्रेशनला बंदी

दरम्यान, वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही. लोकांनी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे, बाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

इतर बातम्या :

Ajit Pawar : मंत्री, आमदार कोरोनाबाधित, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करणार : अजित पवार

Mata Vaishno Devi | वैष्णो देवी मंदिर परिसर चेंगराचेंगरी, मृतांच्या नातेवाईकांना जम्मू-काश्मीर सरकार 10, तर केंद्राकडून 2 लाखांची मदत

वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये 171 दहशतवाद्यांचा खात्मा; अजूनही 168 सक्रीय दहशतवादी, पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांची माहिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.