Mumbai Tree Walk: गर्द झाडीतून चालताना मुंबईत आहोत हेच विसरून जाल, मलबार हिल परिसरात सिंगापूरसारखा प्रकल्प

मुंबईत लवकरच सिंगापूरच्या धर्तीवर ट्री वॉक साकारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना गर्द झाडींतून चालण्याचा अनुभव मिळणार आहे.

Mumbai Tree Walk: गर्द झाडीतून चालताना मुंबईत आहोत हेच विसरून जाल, मलबार हिल परिसरात सिंगापूरसारखा प्रकल्प
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 11:47 AM

मुंबईत लवकरच सिंगापूरच्या (Singapore) धर्तीवर ट्री वॉक हा प्रकल्प साकरला जाणार आहे. या ट्री वॉक (Mumbai Tree walk) अर्थात गर्द झाडींतून निघणाऱ्या वाटेवर चालताना नागरिकांना एक सुखद अनुभव देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रदूषणाचे दररोजचे वाढते निर्देशांक, उंचच उंच भिंतींमुळे आकाशाचेही दुर्लभ दर्शन , लोकलची भागदौड या सगळ्यांमुळे मुंबईकरांना नेहमीच निसर्ग सहवासाची ओढ लागलेली असते. मुंबईकरांची ही इच्छा ट्री वॉक या प्रकल्पाद्वारे पूर्ण होऊ शकते, अशी आशा केली जात आहे.

काय आहे ट्री वॉक प्रकल्प?

मुंबई महापालिकेतर्फे सिंगापूरच्या धर्तीवर मलबार हिल परिसरात ट्री वॉक उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. मलबार टेकड्यांमधील कमला नेहरू उद्यानाजवळ हा प्रकल्प असेल. पुढील वर्षभरात हा प्रकल्प उभारला जाईल. या ट्री वॉकमध्ये पारदर्शक काचेचा वापर केला जाईल. त्यामुळे नागरिकांना झाडांवर चालतोय, असाच भास होईल. तसेच दर 150 मीटर अंतर चालल्यानंतर नागरिकांना बसण्यासाठी सोय असेल. ब्रिटिश कालीन पाइपलाइनच्या चेंबरवर व्ह्युइंग डेक असेल. तसेच या मार्गावर सुरक्षेकरिता ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील.

नेमका कोणत्या ठिकाणी ट्री वॉक?

गिरगाव चौपाटीवरून मलबार हिलवर लोक पायऱ्या चढून जातात. काही लोक रस्त्याद्वारे वाहनांनी तिथवर पोहोचतात. मात्र पायऱ्या चढून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यात मुंबईकरांसह पर्यटकांचीही संख्या जास्त असते. याच ठिकाणी मुंबई महापालिका ट्री वॉक उभारणार आहे. बीएमसी या प्रकल्पासाठी 12.66 कोटी रुपये खर्च करेल, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हा प्रकल्प कमी वेळेत पूर्ण होईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे. टेकडीवर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम आव्हानाचे आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीदरम्यान नुकसान झाल्यास पाच वर्षांपर्यंत दुरुस्तीही केली जाईल.

इतर बातम्या-

Maharashtra Assembly: शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री येणार का? राऊत म्हणतात, मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून नियंत्रण !

Video: कठीण आहे काँग्रेसचं? स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा खाली पडला, सोनिया गांधीही बघत राहिल्या

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....