मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळणार? पवारांच्या आश्वासनानंतर 2 दिवसांत निर्णयाची शक्यता
हॉटेल व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी शिष्टमंडळाला नव्या आदेशाबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय.
अक्षय कुडकेलवार, मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुरर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 5 लेव्हलनुसार अनलॉकिंगला सुरुवात करण्यात आलीय. मुंबईतील रुग्णसंख्या घटली असली तर मुंबईत अद्याप लेव्हल 3 चेच नियम लागू आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल ठराविक वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातही फक्त पार्सल सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, हॉटेल व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी शिष्टमंडळाला नव्या आदेशाबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय. (Hoteliers in Mumbai likely to get relief)
‘आहार’च्या शिष्टमंडळाने आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने हॉटेल्स रात्री 11 पर्यंत 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्याची मागणी करण्यात आली. याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबतचा नवा आदेश काढण्यात येईल, असं आश्वासन शरद पवार यांनी आहार संघटनेला दिलं आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसांत मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना शिथिलता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्यापारी वर्गही नाराज
शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येऊन बरेच दिवस उलटल्यानंतही निर्बंध शिथील न झाल्यामुळे मुंबईतील व्यापारी वर्ग (Traders) ठाकरे सरकारवर नाराज झाला आहे. ‘ब्रेक द चेन’च्या नियमावलीत मुंबईचा (Mumbai) समावेश तातडीने दुसऱ्या स्तरात करावा. जेणेकरून व्यापाऱ्यांना अधिक मोकळीक मिळेल, असे वक्तव्य एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती ही पहिल्या टप्प्याची असताना शहरात तिसऱ्या स्तराचे निर्बंध का लागू आहेत, असा सवालही विरेन शाह यांनी विचारला. नवी मुंबई आणि ठाण्यात व्यापारावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, मुंबईतील व्यापारी निर्बंधांमुळे खड्ड्यात जात आहे. हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदारांचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे, असेही विरेन शाह यांनी म्हटले.
लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेचा अॅक्शन प्लॅन
केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 21 तारखेपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू होत आहे. केंद्र सरकारने जरी मोफत मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) करण्याची घोषणा जरी केली असली तरी मुबलक लस मिळेल का हा प्रश्न आहे यामुळे राज्य सरकारप्रमाणे मुंबई महापालिकेने लसीकरणचा संभाव्य प्लॅन तयार केला आहे. काही खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण सुरू आहे. खासगी सेंटरवर हजारो रुपये मोजुन श्रीमंतांनाच या वषोगटासाठी लस मिळाली. आता सर्वात मोठ्या लोकसंख्येसाठी सर्वसामान्य मुंबईकरांचं लसीकरण पार पाडण्याचा टप्पा आलाय. देशभरात बहुप्रतिक्षीत असलेलं तरुणांचं मोफत लसीकरण सुरु होतंय. त्यासाठी मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे.
“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…. हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल” https://t.co/xvL3Awmapf @RajThackeray @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar @OfficeofUT @Dev_Fadnavis #RajThackeray #MNS #AmeyKhopkar #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2021
संबंधित बातम्या :
Mumbai Unlock: मुंबईतील व्यापारी ठाकरे सरकारवर नाराज; निर्बंध शिथील करण्याची मागणी
Hoteliers in Mumbai likely to get relief