कुणाची माघार, कोण ठाम?; अर्ज मागे घेण्यासाठी अवघा अर्धा तास शिल्लक, सदा सरवणकर काय निर्णय घेणार?
Vidhansabha Election 2024 Application Withdraw Last Day : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघा अर्धा तास शिल्लक आहे. असं असताना कुणाची माघार, कोण ठाम आहे? सदा सरवणकर यांची भूमिका काय? वाचा सविस्तर...
राज्याची विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अवघी काही मिनिटं बाकी आहेत. असं असताना कोण अर्ज मागे घेणार आणि कोण लढण्यावर ठाम आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. असं असताना सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारल्याने आता मी निवडणूक लढणार आहे, असं सदा सरवणकर यांनी जाहीर केलंय.
देवळालीत काय घडतंय?
माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून माघार घेतली आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने कौटुंबिक कलहाचा देखील सामना करावा लागला होता. माघार घेताना तनुजा घोलप भावूक झाल्या. तनुजा घोलप यांचे बंधू योगेश घोलपही ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भावाला निवडणुकीसाठी बहीण म्हणून शुभेच्छा मात्र महायुतीतच राहून महायुतीचा काम करणार आहेत. तनुजा घोलप यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर बबनराव घोलप यांनी नाव न वापरण्याची नोटीस धाडली होती.
एरंडोलमध्ये कुणी घेतली माघार?
जळगावच्या एरंडोल मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांची माघार आहेत. एरंडोल मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून नानाभाऊ महाजन यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.. सकाळपासून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून नानाभाऊ महाजन यांचे मन धरणे केली जात होती. अखेर पदाधिकाऱ्यांना यश आले असून नानाभाऊ महाजन निवडणुकीतून माघार घेणार आहेत. माघार घेत असल्याची माहिती स्वतः नानाभाऊ महाजन यांनी टीव्ही 9 मराठीशी फोनवरून बोलताना दिली आहे.
पाथरी विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचं दिसत आहे. पाथरी विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून बाबाजानी दुर्राणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. वरिष्ठांकडून काही बोलणं झालं का यावर बाबाजानी दुर्राणी यांनी बोलणं टाळलं. मात्र यावेळी निवडणुकीवर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं दुर्राणी यांनी स्पष्ट केलं आहे.
संदीप बाजोरिया यांचं बंड शमलं
यवतमाळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा बंड शमविण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे. शरद पवार च्या सूचनेनंतर माजी आमदार संदीप बाजोरिया घेणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. जिल्ह्यात मविआच्या शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारसाठी मेहनत घेणार असल्याचं संदीप बाजोरिया यांनी म्हटलं आहे.