मुंबई : मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. मुंबईतील एकूण 24 विभागांपैकी 21 विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 200 दिवसांवर पोहोचला आहे. यापैकी 4 विभागात 400 पेक्षा अधिक, 5 विभागात 300 पेक्षा अधिक तर 12 विभागात 200 पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी गाठलेला आहे (Mumbai Ward Wise Corona Patient Doubling Rate increase).
विशेष म्हणजे रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 0.27 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यातही 24 विभागांपैकी 14 विभागात रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.27 टक्के या सरासरीपेक्षाही कमी आहे.
याआधी 5 नोव्हेंबर रोजी मुंबईने 200 दिवसांचा (208 दिवस) टप्पा ओलांडला होता. त्यावेळी रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.33 टक्के इतका होता (Mumbai Ward Wise Corona Patient Doubling Rate increase).
महत्त्वाचे टप्पे
20 ऑक्टोबर : 100 दिवस
24 ऑक्टोबर : 126 दिवस
29 ऑक्टोबर : 150 दिवस
05 नोव्हेंबर : 208 दिवस
14 नोव्हेंबर : 255 दिवस
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा सर्वात जास्त कालावधी असलेले 5 विभाग
इ : 482 दिवस
एफ दक्षिण : 466 दिवस
सी : 444 दिवस
जी उत्तर : 428 दिवस
बी : 392 दिवस
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा सर्वात कमी कालावधी असलेले 5 विभाग
आर मध्य : 209 दिवस
के पश्चिम : 200 दिवस
एच पश्चिम : 191दिवस
पी दक्षिण : 179 दिवस
आर दक्षिण : 174 दिवस
दरम्यान, मुंबईत शनिवारी (14 नोव्हेंबर) 850 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. कालपर्यंत मुंबईत 2 लाख 44 हजार 659 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 91 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या मुंबईत 10 हजार 77 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
#CoronavirusUpdates
14-Nov; 6:00pmDischarged Pts. (24 hrs) – 850
Total Recovered Pts. – 2,44,659
Overall Recovery Rate – 91%Total Active Pts. – *10,077
Doubling Rate – 243 Days
Growth Rate (7 Nov-13 Nov) – 0.29%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 14, 2020
हेही वाचा : अमेरिकेत मृत्यूचं तांडव, कोरोनाने अडीच लाख नागरिकांचा मृत्यू