वरळीतील हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्काची मोठी कारवाई, ‘तो’ बार केला सील

वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शाह अद्यापही मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर दुसरीकडे वरळी हिट अँड रन प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्काची मोठी कारवाई, 'तो' बार केला सील
worli hit and run case
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 1:47 PM

Worli Hit And Run Case Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील वरळी भागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणी आता विविध खुलासे होताना दिसत आहेत. वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शाह अद्यापही मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर दुसरीकडे वरळी हिट अँड रन प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. जुहूच्या व्हाईस ग्लोबल तपस बारला उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले आहे.

मुंबईतील वरळी भागात एका भरधाव वेगाने असलेल्या एका कारने दुचाकीला धडक दिली. यानंतर महिलेवर गाडी चालवून तिला फरफटत नेण्यात आले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. यावेळी ही गाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह चालवत होता. सध्या आरोपी मिहीर शाह हा फरार आहे. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केले आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी कलम १०५,२८१,१२५ १,२८१,१२५ (ब), (ब),२३८,३२४ (४) तसेच १८४,१३४(अ),१३४ (ब), १८७ या मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या अपघाताआधी आरोपी मिहिर शाह दारु प्यायला होता. जुहू परिसरात असलेल्या व्हाईस ग्लोबल तपस बारमध्ये तो दारु प्यायला होता. त्याने जुहूच्या व्हॉईस ग्लोबल तापस बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती. पार्टीनंतर तो वरळीच्या दिशेने निघाला. त्यानंतरच अपघाताची घटना घडली. यानंतर आता वरळी हिट अँड रन प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. जुहू परिसरात असलेल्या व्हाईस ग्लोबल तपस बारला उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले आहे.

हे सुद्धा वाचा

वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून या बारची चौकशी सुरु होती. तब्बल दोन दिवस या बारची चौकशी सुरु होती. उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बारकडून उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. यानंतर आता हा बार सील करण्यात आला आहे.

अपघातानंतर बार मालकांनी दिलेली अशी प्रतिक्रिया

व्हाइस बारचे मालक करण शाह यांनी सांगितले की, मिहिर शाह शनिवारी रात्री 11.08 वाजता चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून बारमध्ये आले होते. त्यांच्यासोबत कोणतीही मुलगी नव्हती. सर्वांनी एक, एक बिअर घेतली. त्यावेळी चौघेही नॉर्मल होते. बिल भरल्यानंतर 1.26 वाजता निघाले. दरम्यान या ठिकाणी असणारा सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

वरळी पोलीस ठाणे हद्दीत आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास प्रदीप नाखवा (वय ५० वर्षे) हे त्यांच्या पत्नी कावेरी प्रदीप नाखवा (वय ४५ वर्षे) यांच्यासोबत त्यांचे मालकीच्या सुझुकी कंपनीची अॅक्सेस स्कुटर क्र एम.एच ०१, डी.यु ६४१८ वरून अॅनी बेझंट रोड वरुन वरळी कोळीवाड्याकडे जात होते. या दरम्यान लॅन्डमार्क जीप शोरूम समोर, डॉ. अॅनी बेझंट रोड, येथे मागुन येणाऱ्या बीएमडब्लु कार क्र एम. एच ४८, ए. के-४५५४ या कारने स्कुटरला मागुन जोराची धडक दिली.

संबंधित गाडी ही मिहीर शाह याची होती. त्याने महिलेला दूरपर्यंत फरफटत नेलं होतं. या घटनेबाबत वरळी पोलीस ठाण्याला खबर मिळाली असता वरळी पोलीस ठाण्यातील मोबाईल वाहन आणि स्टाफने जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी नायर हॉस्पीटल येथे नेलं. पण तेथील अपघात विभागातील डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. पोलिसांनी राजेश शाह आणि अपघातावेळी सोबत असलेला व्यक्ती राजेंद्रसिंग बिडावत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.