इंधन दरवाढीमुळे नागरिक हैराण, मुंबईतल्या पठ्ठ्याकडून बॅटरीवर चालणाऱ्या सायकलची निर्मिती, किंमत…

मुंबईतील एका युवकाने बॅटरीवर चालणारी सायकल (electric cycle) बनवली आहे. अशी सायकल बाजारात आली तर सामान्य माणसाला याचा फायदा होईल.

इंधन दरवाढीमुळे नागरिक हैराण, मुंबईतल्या पठ्ठ्याकडून बॅटरीवर चालणाऱ्या सायकलची निर्मिती, किंमत...
electric cycle
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 10:29 PM

मुंबई : सध्या पेट्रोलच्या किंमतीने शतक पार केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. ही परिस्थिती पाहता मुंबईतील एका युवकाने बॅटरीवर चालणारी सायकल (electric cycle) बनवली आहे. अशी सायकल बाजारात आली तर यामुळे सामान्य माणसाला नक्कीच फायदा होईल, असे म्हटले जात आहे. (Mumbai youth made electric bycycle, can run 20 km in single charge)

बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद देशातील अन्य मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रामुख्याने डिलिव्हरीसाठी अशा प्रकारच्या सायकलचा उपयोग केला जातो. या सायकलींवर 20 पैसे प्रतिकिलोमीटर इतका खर्च होतो. त्यामुळे बाईक आणि स्कूटरच्या तुलनेत या सायकल बेस्ट ठरतात.

या सायकलमध्ये लिथियम बॅटरीचा उपयोग केला जातो, तसेच ही बॅटरी आपण आपल्या घरातच चार्ज करू शकतो. संपूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यामध्ये ही 80 टक्के चार्ज होऊ शकते. ही बॅटरी आणि सायकल बनवणाऱ्या विकास गुप्ता यांनी सांगितले की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकल 20 ते 40 किलोमीटर इतक्या लांबचा पल्ला गाठू शकते.

ही सायकल मुंबईतील व्हीजेटीआय कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने बनवली असून ही सायकल बनवण्यास जवळपास 22 हजार रुपये इतका खर्च आला आहे. त्यासोबतच हीच सायकल बाजारात उपलब्ध झाली तर त्याची किंमत 27 हजार रुपयांपर्यंत असू शकते. विविध स्तरांवर या सायकलची टेस्टिंग सुरु आहे.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, नव्या सुविधा मिळणार, सरकारचा नवा नियम

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

(Mumbai youth made electric bycycle, can run 20 km in single charge)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.