Online Shopping: मुंबईकर ऑनलाईन कंडोम खरेदीत आघाडीवर, वर्षभरात खपवले एवढे कंडोम

एका सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते जूनच्या काळात मेट्रो शहरांत आइस्क्रिमच्या मागणीत 42टक्के वाढ झाली आहे. या सगळ्या ऑर्डर रात्री 10 नंतर देण्यात आल्याचेही समोर आले आहे. या मेट्रो शहरांमध्ये इन्स्टन्ट न्यूडल्सच्या 56 लाख पाकिटांची ऑर्डर देण्यात आली.

Online Shopping: मुंबईकर ऑनलाईन कंडोम खरेदीत आघाडीवर, वर्षभरात खपवले एवढे कंडोम
ऑनलाईन शॉपिंगमध्ये मुंबईत जास्त मागणीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 11:11 PM

नवी दिल्ली – देशात सध्या बरेचजण मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग (online shopping)करतात. ग्रोसरी सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहजपणे गरजेच्या वस्तू लोकांच्या घरी पोहचतात. अगदी भाज्यांपासून ते औषधांपर्यंत, फक्त स्मार्टफोनवरच्या (Smart phone)काही क्लिकद्वारे सामान तुमच्या दारापर्यंत पोहचते. एका सर्वेक्षणानुसार स्विगी इन्स्टामार्टने जून 2021 ते जून 2022 या काळात सुमारे 90 लाख ग्राहकांहून अधिक ग्राहकांना (customers)ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरुसारख्या मोठ्या महानगरांमध्ये ऑनलाईन सामान खरेदी करण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.

हेल्थकेअर प्रोडक्ट्सच्या ऑर्डर

ग्राहक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधांबाबतच्या वस्तूही या प्लॅटफॉर्मवर ऑर्डर करता येतात. यातली एका सर्वेनुसार, गेल्या 12  महिन्यांत मुंबईकरांनी 570 पट अधिक कंडोम ऑर्डर केले आहेत. तर 2021साली इन्स्टामार्टला सुमारे 20 लाख सॅनिटरी नॅपकिन, मेन्स्ट्रुअल कप आणि टैम्पॉनच्या ऑर्डर करण्यात आल्या आहेत. यासह ग्रॉसरीच्याही अनेक वस्तूंच्याही खूप ऑर्डर करण्यात आल्या आहेत.

न्यूडल्सच्या 56लाख पाकिटांच्या ऑर्डर

एका सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते जूनच्या काळात मेट्रो शहरांत आइस्क्रिमच्या मागणीत 42टक्के वाढ झाली आहे. या सगळ्या ऑर्डर रात्री 10 नंतर देण्यात आल्याचेही समोर आले आहे. या मेट्रो शहरांमध्ये इन्स्टन्ट न्यूडल्सच्या 56 लाख पाकिटांची ऑर्डर देण्यात आली. एकट्या हैदराबादमध्ये उन्हाळ्यात युझर्सनी फ्रेश ज्यूसच्या 27 हजार बाटल्या मागवल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

60लाख अंड्यांच्या ऑर्डर

गेल्या दोन वर्षांत अंड्यांची मागणी बरीच वाढली आहे. दिल्ली, मुंबईसहित मेट्रो शहरात राहणाऱ्यांनी गेल्या एका वर्षात सुमारे 60 लाख अंड्यांची ऑर्डर केली आहे. बंगळुरु आणि हैदराबादमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टसाठी सर्वाधिक अंड्यांच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. तर मुंबई, जयपूर आणि कोइम्बतूरमध्ये युझर्सनी डिनरसाठी अंड्यांच्या ऑर्र केल्याची माहिती आहे.

डेयरी प्रोडक्ट्सलाही चांगली मागणी

चहा आणि कॉफीच्या ऑर्डरमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार, या मागणीत 2000टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर दुधासाठी 3 कोटी ऑर्डर्स आल्या आहेत. बंगळुरु आणि मुंबईत सकाळच्या वेळी या ऑर्डर सर्वाधिक आहेत. रेग्युलर दूध, फुल क्रीम मिल्क आणि टोंड दूध यांना सर्वाधिक मागणी आहे.

फळे आणि भाज्यांच्याही जास्त ऑर्डर

गेल्या वर्षभरात 62 हजार टन फळे आणि भाज्यांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. 12 हजार ऑर्डरसह बंगळुरु ऑर्गेनिक प्रो़डक्टच्या खरेदीत अग्रस्थानी आहे. हैदराबाद आणि बंगळरुत गेल्या 12  महिन्यांत 290 टन हिरवी मिर्ची ऑर्डर करण्यात आली आहे. बाथरुम क्लीनर, स्क्रब पॅड, ड्रेन क्लीनरच्याही २ लाखांहून अधिक ऑर्डर आल्या आहेत.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.