मुंबईकर सावध हो! ओमिक्रॉनच्या ‘धोकादायक’ देशातून अडीच हजारापेक्षा जास्त जण मुंबईत, काय आहे BMC तयारी?

विशेष म्हणजे यांच्यापैकीच 9 जण आणि त्यांच्या संपर्कातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून, त्यांचा ओमिक्रॉनचा अहवाल प्रतिक्षेत आहे. त्यामुळेच मुंबईकरांनी आता घरात आणि घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे.

मुंबईकर सावध हो! ओमिक्रॉनच्या 'धोकादायक' देशातून अडीच हजारापेक्षा जास्त जण मुंबईत, काय आहे BMC तयारी?
मुंबईत धोकादायक देशातून अडीच हजारापेक्षा जास्त जण दाखल
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 8:18 AM

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, (Karnatak Omicron Cases ) त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, ह्या माहितीनेच डोकं भणाणत असतानाच आता मुंबईकरांचं, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं आहे. कारण गेल्या काही दिवसात मुंबईत (Mumbai on Omicron Alert) ओमिक्रॉनच्या धोकादायक अशा देशातून हजार पाचशे नाही तर 2668 जण दाखल झालेत. विशेष म्हणजे यांच्यापैकीच 9 जण आणि त्यांच्या संपर्कातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून, त्यांचा ओमिक्रॉनचा अहवाल प्रतिक्षेत आहे. त्यामुळेच मुंबईकरांनी आता घरात आणि घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे. आधीच अवकाळी पावसानं वातावरण डल केलेलं असताना, त्यात आणखी आरोग्याच्या समस्या उदभवणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे.

धोकादायक देश

यूरोप, आफ्रिका, अमेरीका मिळून 40 देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव झालेला आहे. भारतानं हाय रिस्क (Omicron High Risk Countries) म्हणजेच धोकादाय देशांची यादी जाहीर केलीय. त्यात 11 देश आहेत. त्यात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बोत्सवाना, चीन, झिम्बाब्वे, मॉरीशस, हॉंगकॉंग, न्यूझीलंड, सिंगापूर यांचा समावेश आहे. म्हणजेच या देशातून जे कुणी प्रवासी भारतात येतील, त्यांच्यावर प्रशासनाची कडक नजर असेल. तसच त्यांना चाचणी, क्वारंटाईनचे सगळे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. टाईम टू टाईम ही धोकादायक देशांची यादी अपडेट होईल. पण 10 नोव्हेंबरपासून आतापर्यंत जिथं कोरोनानं हातपाय पसरलेत अशा 40 देशातून 2868 जण मुंबईत दाखल झालेत.

त्यांचा शोध सुरु

गेल्या 20-25 दिवसात हाय रिस्क देशातून जे लोक दाखल झालेत त्यांचा शोध घेतला जातोय. त्यापैकी 500 जणांचा शोध लागला असून त्यांच्या सर्व चाचण्या केल्या गेल्यात. त्यापैकीच 10 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. हे 10 जण मुंबई, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, भाईंदर, अशा मोठ्या शहरातले रुग्ण आहेत. जे 40 देशातून दाखल झालेत, त्यांची एक लिस्ट तयार करण्यात आलीय. (BMC omicron preparation) जे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत, त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग केली जातेय. तसच ओमिक्रॉन आहे की नाही याची माहिती देणारी एस जिन चाचणीही केली जाणार आहे. याचा रिपोर्ट आज उद्या अपेक्षीत आहे. ह्या सर्व चाचण्यावरच पुढील सगळी दिशा स्पष्ट होणार आहे.

मुंबई महापालिकेची तयारी

ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका कामाला लागली आहे. दहा जम्बो कोविड सेंटर्स सज्ज करण्यात येणार आहेत. सध्यस्थितीत 5 जम्बो कोविड सेंटर्स कार्यरत आहेत. 10 जम्बो कोविड सेंटर्समुळे 13 हजार 466 बेड जे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह सुसज्ज असतील.

सध्याची उपलब्ध बेडसंख्या-

  1. दहिसर, कांदरपाडा –                700
  2. मालाड जम्बो-                          2200
  3. नेस्को गोरेगाव फेज 1 –             2221
  4. नेस्को गोरेगाव फेज 2-              1500
  5. बीकेसी कोविड सेंटर-               2328
  6. कांजूरमार्ग कोविड-                   2000
  7. सायन जम्बो कोविड-                1500
  8. आरसी भायखळा-                    1000
  9. आरसी मुलुंड जम्बो-                 1708

मुंबईत सध्यस्थितीत तरी कोरोना नियंत्रणात आहे. दैनंदिन रुग्णसंख्या घटलेली आहे. ही संख्या शंभरपर्यंत खाली गेलीय. पण ओमिक्रॉनचं नवं संकट उभं राहिलंय. त्यापार्श्वभूमीवर प्रशासन आणि जनता दोघांनाही एकमेकांना सहकार्य केलं तरच ओमिक्रॉनचं संकट रोखता येण्यासारखं आहे.

हे सुद्धा वाचा:

Gita Gopinath : IMF मध्ये महिलाराज, भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

Satara Murder | चारित्र्याच्या संशयातून बायकोला पेटवलं, महाबळेश्वरमधील पतीला जन्मठेपेची शिक्षा

Money Heist Season 5 Part 2 | Alicia गेम चेंजर ठरणार की प्रोफेसर पुन्हा एकदा मात देणार? ‘मनी हाईस्ट’च्या शेवटच्या भागात काय घडणार?

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.