मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळणार, पालिका लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

येत्या काही दिवसात पालिका प्रशासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Mumbaikar will get free Corona vaccine)

मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळणार, पालिका लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत
BMC Corona Vaccine
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 6:33 PM

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईतही बाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासन लवकरच याबाबतचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbaikar will get free Corona vaccine BMC may take decision soon)

भाजप खासदाराचे पालिका आयुक्तांचे पत्र

मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत डोअर टू डोअर लस देण्याची मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली होती. मनोज कोटक यांनी गुरुवारी 29 एप्रिलला याबाबतचे एक पत्र मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना लिहिले होते. यात मनोज कोटक यांनी पालिकेच्या सहकार्याने स्वयंसेवी संस्थांना वैद्यकीय सुविधेसह परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

नियमांचे पालन करून लसीकरण 

मनोज कोटक यांच्या मागणीवर पालिकेकडून सकारात्मक विचार सुरु असल्याचे माहिती मिळत आहे. त्यानुसार, एखाद्या सोसायटीचा थेट रुग्णालयाशी टायअप करायचा. त्यानंतर सर्व नियमांचे पालन करून लसीकरण करायचे, अशी संकल्पना पालिका प्रशासन अमलात आणू शकते. (Mumbaikar will get free Corona vaccine BMC may take decision soon)

लवकरच मुंबईकरांना घरीच कोरोनाची लस

तसेच मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये आणि सोसायट्यामध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतीही त्रास न देता सहजपणे लस दिली जाऊ शकते. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांना लवकर कोरोना लस देणे बंधनकारक आहे. हे लक्षात घेऊन मनोज कोटक यांनी बीएमसीकडे डोर टू डोर लस देण्याची मागणी केली होती.

त्यामुळे लवकरच मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसात पालिका प्रशासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती काय? 

राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 10 हजारांनी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात काल दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात काल 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (Mumbaikar will get free Corona vaccine BMC may take decision soon)

संबंधित बातम्या : 

Mumbai Corona Cases | मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार; दिलासादायक माहिती समोर

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....