MumbaiNews: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, ते 7 जण नेगेटीव्ह, आणखी दोघांच्या रिपोर्टची प्रतिक्षा

त्यात आफ्रिकन तसच यूरोपियन देशांचा समावेश आहे. या देशांमधून 485 जण मुंबईत दाखल झालेत. त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातले 9 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता त्यातल्या 7 जणांची ओमिक्रॉन चाचणीही नेगेटिव्ह आलीय. त्यामुळे भीतीग्रस्त मुंबईकरांनी सुटकेचा नि: श्वास सोडलाय.

MumbaiNews: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, ते 7 जण नेगेटीव्ह, आणखी दोघांच्या रिपोर्टची प्रतिक्षा
मुंबईत्या त्या 7 जणांची ओमिक्रॉन चाचणी नेगेटीव्ह
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 8:13 AM

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईकरांसाठी ओमिक्रॉनच्या (Mumbai Omicron News) व्हेरीएंटनं भीती निर्माण केलेली असतानाच आता एक दिलासादायक वृत्त हाती आलंय. परदेशातून आलेल्या ज्या 9 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यापैकी 7 जणांची ओमिक्रॉन चाचणी (Omicron Mumbai Test) मात्र नेगेटीव्ह आलीय. आणखी दोन रुग्णांचा अहवाल मात्र अजून आलेला नाही. ह्या 9 रुग्णांवर ओमिक्रॉनची एस जिन चाचणी घेण्यात आली होती. भारतानं 11 देशांना ओमिक्रॉनच्या हाय रिस्क देशांच्या यादीत टाकलेलं आहे. त्यात आफ्रिकन तसच यूरोपियन देशांचा समावेश आहे. या देशांमधून 485 जण मुंबईत दाखल झालेत. त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातले 9 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता त्यातल्या 7 जणांची ओमिक्रॉन चाचणीही नेगेटिव्ह आलीय. त्यामुळे भीतीग्रस्त मुंबईकरांनी सुटकेचा नि: श्वास सोडलाय.

म्हणून मोकळं रान नको 7 जणांची ओमिक्रॉनची चाचणी नेगेटीव्ह आली असली तरीसुद्धा मुंबईकरांना मोकळीक मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण कोरोनाचे निर्बंध पाळले तर लढाई जिंकू शकतो. त्यातही गेल्या दोन दिवसात परदेशातून विशेषत: धोकादायक देशातून 2868 जण दाखल झालेत. ह्या सर्वांची कोरोना टेस्ट झालीय. त्यातल्या काहींचे रिपोर्ट आलेत, काहींचे प्रतिक्षेत आहेत. जे पॉझिटिव्ह आलेत, त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग केलं जातंय. त्याचे सँपल पुण्याला (Pune Omicron News ) पाठवले गेलेत. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वन्सिंगचे मशिन बसवण्यात आलेय. तिथं एका वेळी 288 नमुने तपासता येतात. त्यामुळे 16 बाधित रुग्णांचे लवकर रिपोर्ट यावेत म्हणून पुण्याला सँपल पाठवले गेलेत.

रुग्णांवर सेव्हन हिल्समध्ये उपचार परदेशातून आलेले 10 जण सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्या सर्वांवर मुंबईतल्या सेव्हन हिल्स (Seven Hills Hospital) रुग्णालयात उपचार केले जातायत. विशेष म्हणजे ह्या रुग्णांना कुठलेही गंभीर अशी लक्षणं नाहीत. ओमिक्रॉन संशयितांच्या उपचारासाठी व्यवस्था चोख ठेवण्यात आलीय. सेव्हन हिल्सशिवाय ब्रीच कँडीमध्येही (Breach Candy Hospital) ओमिक्रॉन संशयितांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभी केली गेलीय.

हे सुद्धा वाचा:

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात

वडिलांपाठोपाठ लेकही गेला, कृषी पंपाचे कनेक्शन जोडताना खांबावरच शॉक, 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Weather Forecast : कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, पावसाळी वातावरण कधी संपणार? आयएमडीनं दिली माहिती

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.