#MumbaiRains | अरे हा तर ‘हिवसाळा’! मुंबईत रिमझिम, उद्या छत्री, रेनकोट सोबत ठेवावा लागणार?
मुंबईत सर्वदूर पावसानं दुपारी अचानक हजेरी लावली. सकाळपासून मु्ंबईत ढगाळ वातावरण होतं. अशातच ऐन भंडीच्या दिवसात पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा साथीच्या रोगांना आमंत्रण मिळेल, अशीही भीती व्यक्त केली जातेय.
मुंबई : मुंबई (Mumbai) ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसल्यात. मुंबईतील पश्चिम उपनगरासह मध्य उपनगरातही पावसानं (Rain) अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. पाऊस मुसळधार झारा नसला, तरी रिमझिम सरी बरसल्यानं मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यामुळे पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात होता. अशातच दुपारच्या सुमारास मुंबईत पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
मुंबईत सर्वदूर पावसानं दुपारी अचानक हजेरी लावली. सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण होतं. अशातच ऐन भंडीच्या दिवसात पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा साथीच्या रोगांना आमंत्रण मिळेल, अशीही भीती व्यक्त केली जातेय. आधीच मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा धोका वाढलेला असताचा अवकाळी पावसानं वातावरणातही बदल झाल्याचंच बघायला मिळालंय.
Viral flu after seeing rain in January!!! #MumbaiRains pic.twitter.com/hKZOu8ipq1
— Tejas Naik (@Tejasnaik01) January 8, 2022
कांदिवली चारकोप या भागात पावसानं हजेरी लावली असून अनेकांनी या पावसाबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. काहींनी तर कधीही आणि अचानक होणाऱ्या पावसाच्या घटना वाढल्यानं मुंबईचं लंडन झालंय की काय, असाही प्रश्न उपस्थित केलाय.
Kandivali in #Mumbai #Maharashtra witnesses Short spell of Intense rains right now due to Western Disturbance. VC: Shreyas Dhavale.#MumbaiRains pic.twitter.com/MKDzZ9NsNz
— Live Weather Of India (@LiveWxIndia) January 8, 2022
गोरेगावमध्येही पाऊस झाला असून रस्ते पावसाच्या पाण्यानं भिजल्याचं पाहायला मिळालं. दुपारच्या वेळेला फारशी रहदारी नसल्यामुळे या पावसाचा फटका फारसा कुणाला बसला नाही. मात्र फेरीवाल्यांचा या पावसानं तारांबळ उडवली होती.
Goregaon West Motilal Nagar-3 Rainfall Video #MumbaiRains pic.twitter.com/xrEfAuaFR9
— AYAZ Y. KHAN (PAPPU) (@AYAZYKHAN2) January 8, 2022
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरही पावसामुळे तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. अनेक दुचाकीस्वारांची अचानक आलेल्या पावसानं भंबेरी उडवली होती.
It’s Raining in Powai #MumbaiRains #mumbaicity #RainyDay #rain #weather #WeatherUpdate #WeatherReport pic.twitter.com/pL7v1hZjzn
— Anand N. Ingle (@anand_ingle89) January 8, 2022
उद्या छत्री सोबत ठेवावी लागणार?
अचानक आज पावसानं हजेरी लावल्यामुळे आता पुन्हा एकदा छत्री सोबतच ठेवावी लागणार का, असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. दरम्यान, स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत फार काळ पाऊस पडेल, अशी शक्यता नाकारली आहे. उद्या ढगाळ वातावरण नसेल, असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. रविवारी मुंबई स्वच्छ वातावरण असेल, असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
This freak #MumbaiRains incident is not going to be a long lasting one, expect weather conditions to improve as the day proceeds. #Weather will be dry tomorrow. #WeatherForecast #Mumbai
— SkymetWeather (@SkymetWeather) January 8, 2022
इतर बातम्या –
Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना…भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!