मुंबईतल्या इस्लाम जिमखान्यात रमी खेळण्यास बंदी; सदस्य म्हणातात, हा काय मदरसा आहे का?
गेल्या 129 वर्षांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं केंद्र ठरलेल्या प्रसिद्ध इस्लाम जिमखान्यात रमी खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला असून इस्लामिक जिमखाना हा काय मदरसा आहे काय?, असा सवाल जिमखान्याच्या सदस्यांनी केला आहे.
मुंबई: गेल्या 129 वर्षांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं केंद्र ठरलेल्या प्रसिद्ध इस्लाम जिमखान्यात रमी खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला असून इस्लाम जिमखाना हा काय मदरसा आहे काय?, असा सवाल जिमखान्याच्या सदस्यांनी केला आहे. (mumbai’s islam Gymkhana Bans Rummy Members Livid Religin Card)
इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष युसूफ अब्रहानी यांनी कॅम्पसमध्ये रमी खेळण्यावर बंदी घातली आहे. काही सदस्य रमी खेळण्याच्या बहाण्याने जुगार खेळत असून सट्टाही लावत आहेत. त्यामुळे रमी खेळण्यास बंदी घालण्यात येत असल्याचं अब्रहानी यांनी म्हटलं आहे. मात्र, अब्रहानी यांच्या या निर्णयाला सदस्यांमधून विरोध होत आहे. जिमखान्याला मदरश्याचं स्वरुप दिलं जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
जिमखान्यात जुगार खेळला जात असल्याचं अब्रहानी यांना वाटतं तर ते पोलिसांत तक्रार का करत नाहीत? हा एक क्लब आहे, मदरसा नाही. या ठिकाणी त्यांनी धार्मिक कार्ड खेळू नये, असं जिमखान्याचे सदस्य इश्तियाक अली यांनी म्हटलं आहे. तर, जिमखान्यात सीनियर सिटिजन्स आणि गैर हिंदू सदस्यही आहेत. त्यामुळे रमी खेळण्यास प्रतिबंध घातल्याने त्यामुळे चुकीचा संदेश जाईल, असं दुसरे सदस्य आसिफ फारुकी यांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले युसूफ अब्रहानी यांनी मात्र, आम्ही सर्वच खेळांना प्रोत्साहन देत असल्याचं म्हटलं आहे. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, हॉलिबॉल, स्पा, स्टिम बाथ आदी गोष्टी जिममध्ये आहेत. मात्र, रमी खेळण्याच्या नादात काही लोक जुगाराकडे ओढले गेले आहेत, असं सांगतनाच मदरशाचं नाव घेऊन टीका करणाऱ्यांनो मदरशात स्पा आणि स्टिम बाथची सुविधा आहे का?, असा संतप्त सवाल युसूफ अब्रहानी यांनी केला आहे. (mumbai’s islam Gymkhana Bans Rummy Members Livid Religin Card)
महत्त्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/Ngx2HsGLRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
ताज्या बातम्या:
मौज-मजेसाठी महागड्या दुचाकींची चोरी, उल्हासनगरातील तिघे ताब्यात
विधानसभेला पराभव, विधानपरिषदही नाही, काँग्रेसचे माजी मंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत
(mumbai’s islam Gymkhana Bans Rummy Members Livid Religin Card)