राज ठाकरे यांनी व्हिडीओ दाखवताच ‘त्या’ परिसरात पोलीस पोहोचले, माहिमच्या समुद्रात मोठ्या घडामोडी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माहिमच्या समुद्रातला एक व्हिडीओ दाखवल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात घडामोडींना वेग आलेला बघायला मिळतोय.

राज ठाकरे यांनी व्हिडीओ दाखवताच 'त्या' परिसरात पोलीस पोहोचले, माहिमच्या समुद्रात मोठ्या घडामोडी?
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 10:15 PM

निखिल चव्हाण, Tv9 मराठी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या आजच्या सभेत एक खूप महत्त्वाची माहिती दिली. माहिमच्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यासाठी राज ठाकरे यांनी संबंधित जागेचे व्हिडीओ दाखवले. या व्हिडीओत भर समुद्रात दर्गा सदृश्य काहीतरी बांधकाम करण्यात आल्याचं निदर्शनास आलं. संबंधित बांधकाम हटवण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी समुद्रातील अनधिकृत बांधकाम दाखवल्यानंतर लगेच तातडीने पोलीस कामाला लागले आहेत. पोलीस संबंधित परिसरात दाखल झाले आहेत.

संबंधित परिसर हा माहिमच्या किल्ल्यापासून थोड्याच अंतरावर आहे. तिथे दर्ग्याचं बांधकाम केलं जात असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय. पोलिसांना याबाबत कल्पना नव्हती. पण राज ठाकरेंनी फोटो दाखवल्यानंतर संबंधित परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. कोणाताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जातेय. पोलिसांनी समुद्रातही गस्त घालायला सुरवात केली आहे. पोलिसांची एक व्हॅन पाण्यात गेली आहे. संबंधित ठिकाणी नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, असा अंदाज बांधला जातोय. दरम्यान, पोलीस राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांनुसार जागेची पाहणी करुन पडताळणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी संबंधित जागेची पडताळणी करणार आहेत. ती जागा जिल्हाधिकारी यांच्या प्रांतात येत असल्याची प्राथमिक माहिती असल्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस दोघांकडून जागा पडताळली जाणार आहे. जर तथ्य असेल आणि अनधिकृत बांधकाम असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“हा इतिहासकालीन दर्गा. त्याच्या पुढे अनधिकृतपणे समुद्रात उभं केलं. माहिम पोलीस स्टेशन जवळ आहे. लक्ष नाही. महापालिकाचे लोकं उभे असतात. पण पाहिलं नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजी अली तयार करणार? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिश्नर, महापालिका आयुक्तांना आजच सांगतो महिन्याभरात कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाहीत. वाट्टेल ते फाजील चाळे चालणार नाही. एकदा माझ्याकडे राज्य आलं तर आख्खं राज्य सुतासारखं सरळ करेन. परत कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही. तुमची ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. खरंतर गरज नाही. पण दाखवावी लागणार. मुसलमान समाजाला हे मान्य आहे का? कुणाची समाधी आहे ती, माशाची? हे दाखवण्यासाठी हा स्क्रिन लावला होता”, असं राज ठाकरे म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.