ठाकरे सरकारचे बडे मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, कोणत्या मुद्यावर चर्चा?

उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar)आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले होते.

ठाकरे सरकारचे बडे मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, कोणत्या मुद्यावर चर्चा?
भगतसिंह कोश्यारी, अशोक चव्हाण, अजित पवारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 8:36 PM

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यातील संघर्ष वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी घोषणाबाजी केली होती. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचं शिष्टमंडळ आठवड्यात दुसऱ्यांदा राज्यपालांच्या भेटीला गेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar)आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले होते. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी राज्यपालांसोबत विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती आहे. राज्य सरकारचा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्चला घेण्याचा प्रयत्न आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी केल्याची माहिती आहे.

राज्यपाल परवानगी देणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक 9 मार्चला घेण्यासाठी महाविकास आघाडीनं परवानगी मागितली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी राज्य सरकारनं नियमात बदल केला होता. विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निवडणूक प्रक्रियेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी केली असल्याचं कळतंय.

राज्यपालांच्या मनधरणीला यश येणार?

महाविकास आघाडी सरकारचं स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी आघाडी यांच्यात संघर्ष सुरु राहिलेला आहे. या वादाचा अंक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी राज्यपालाचं नाव न घेता मुद्दा मांडला होता. ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद कमी करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मनधरणी केल्याचा प्रयत्न केलाय, आता त्याला यश मिळणार का हे पाहावं लागेल.

गिरीश महाजन न्यायालयात

दरम्यान, याच निवडणुकीवर,भाजप नेते गिरीश महाजन विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रिये विरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी न्यायालयानं सांगितलेले 10 लाख रुपये भरले आहेत. उच्च न्यायालयात गिरीश महाजन यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणी पूर्वी,राज्यपाल परवानगी देतात का ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.

इतर बातम्या:

Exit Poll Result 2022 : उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये काँग्रेस बहुमताने सत्ता स्थापणार! नितीन राऊतांचा दावा

Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आप, यूपी-गोव्यात भाजप, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?; वाचा एका क्लिकवर

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.