ब्लॅकमेलशिवाय मुंडे आणखी काय बोलणार? पण मी मरेपर्यंत लढेन: रेणू शर्मा
गायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. (Singer Renu Sharma Accuses Congress Minister Dhananjay Munde)
मुंबई: गायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यावर खंडणी वसूल करण्यासाठीच माझ्यावर बलात्काराचा आरोप करून मला ब्लॅकमेल केलं जात असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यावर रेणू शर्मा यांनी ब्लॅकमेलच्या मुद्द्याशिवाय मुंडे आणखी काय बोलणार? असं सांगत आपण शेवटरपर्यंत लढणार असल्याचं म्हटलं आहे. (Singer Renu Sharma Accuses Congress Minister Dhananjay Munde)
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच रेणू आणि तिचा भाऊ खंडणीसाठीच आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यावर रेणू यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे. ब्लॅकमेलशिवाय ते कशाचा आधार घेऊ शकतात? पण मी मरेपर्यंत लढत राहणार, असं रेणू यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याला धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी लेखी तक्रार नोंदवून न घेतल्याबद्दलही रेणूने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पोलीस असो की इतर राज्यांची पोलीस, मी सर्वांचा आदर करते. पण काही लोक त्यांच्या पदाचा फायदा उठवून पोलिसांना काम करू देत नाही, असंही रेणूने म्हटलं आहे.
आपल्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याचं मुंडे सांगत आहेत. त्याचवेळी दोन महिलांशी संबंध असून मुलेही झाल्याची कबुली देत आहे. त्यामुळे कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे तुम्हीच पाहा, असंही तिने म्हटलं आहे. रेणू यांनी एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट करून मुंडेवर निशाणा साधला आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Ye blackmail k alawa koi our baat ka sahara le bhi nahi sakta, par Mai ladungi till mu death!!
— renu sharma (@renusharma018) January 12, 2021
दरम्यान, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फक्त बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं काही होत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांची बाजू मांडली आहे. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्यासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. करुणा शर्मा या रेणू शर्मा यांच्या बहीण आहेत. तसेच, परस्पर सहमतीच्या संबंधामधून करुणा शर्मायांच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये असल्याचेही त्यांनी म्हटलंय. सदर दोन्ही मुलांना मुंडे यांनी त्यांचे नाव दिल्याचे सांगत सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव असल्याचं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलंय. (Singer Renu Sharma Accuses Congress Minister Dhananjay Munde)
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडीचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://t.co/tVTTxh0nv7 #DhananjayMunde | @BJP4Maharashtra | #BJP | #RenuSharma
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 13, 2021
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडी आक्रमक
बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?
धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांनाच पत्रं
(Singer Renu Sharma Accuses Congress Minister Dhananjay Munde)