AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 70 बेपत्ता कोरोना रुग्णांची यादी, आरोग्य अधिकारी आणि पोलिसाच्या समावेशाने बीएमसीचा अजब कारभार उघड

कोरोना रुग्ण बेपत्ता असल्याचं सांगत बीएमसीने मुंबईतील मालाडच्या 70 जणांची यादीच काढली आहे (BMC list of Missing corona patients).

मुंबईत 70 बेपत्ता कोरोना रुग्णांची यादी, आरोग्य अधिकारी आणि पोलिसाच्या समावेशाने बीएमसीचा अजब कारभार उघड
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 7:57 PM

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यातच मुंबईतील मालाड पी नॉर्थ वार्डात एकूण 70 कोरोना रुग्ण बेपत्ता असल्याचं सांगत मुंबई महानगरपालिकेने (BMC) त्यांची यादीच काढली (BMC list of Missing corona patients). मात्र, या यादीत बीएमसीच्याच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याचाही नंबर आल्याने बीएमसीचा अजब कारभार उघड झाला आहे. पी नार्थ वार्डाचे प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या प्रकाराची माहिती ट्वीट करुन दिली आहे. संबंधित अधिकारी कोरोना संसर्गित नसून त्यांनी तशी चाचणीही केलेली नसताना त्यांचा संपर्क क्रमांक थेट बेपत्ता कोरोना रुग्णांच्या यादीत आल्याने हा गोंधळ समोर आला.

बीएमसीने मालाडमधील 70 कोरोना रुग्ण बेपत्ता असल्याचं सांगत त्यांचे संपर्क क्रमांक आणि यादीच काढली होती. या रुग्णांपैकी काहींचे फोन बंद आहेत, तर काहींचं घर बंद असल्याची तक्रार बीएमसीने केली आहे. तसेच मुंबई पोलिसांना या रुग्णांचा शोध घेण्यासाठी मदत मागितली. यानंतर एकच खळबळ उडाली. यावर मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख म्हणाले होते, “काही लोकांशी संपर्क होत नाही हे खरं आहे. मात्र, ते पळून गेलेले नाहीत. कदाचित त्यातील काही स्थलांतरित मजूर असू शकतात किंवा इतर काही कारण असू शकेल. आम्ही पोलिसांची मदत घेत आहोत.”

मात्र, आता याच संपर्क होऊ न शकलेल्या कोरोना रुग्णांच्या यादीत कोरोना संसर्ग न झालेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक आढळल्याने या यादीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. यामुळे बीएमसीचा हा गोंधळ निर्माण करणारा अजब कारभार देखील चव्हाट्यावर आला आहे. पी नार्थ वार्डाच्या या यादीत पी नार्थचे आरोग्य अधिकारी याच्या संपर्क क्रमांकाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना चाचणी देखील केलेली नाही.

पी नार्थ वार्डाचे प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या प्रकाराची माहिती ट्वीट करुन दिली आहे. या यादीत अशाच प्रकारे इतरही नावं आहेत ज्याचा उपचार सुरु आहे किंवा जे उपचारानंतर बरे झाले आहेत. मालाडच्या एका पोलिसाचंही या यादीत नाव आहे. हा बीएमसीचा बेजबाबदारपणा आहे. ज्याने ही यादी बनवली आहे त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी विनोद मिश्रा यांनी केली आहे.

हेही वाचा :

दोन्ही डोळ्यांनी अंध, 2 महिन्यात एकही रजा नाही, सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल करुन मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात…

BMC list of Missing corona patients

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.