लाडकी बहीण योजनेला टफ देणारी योजना आणणार, एवढी रक्कम देणार, दरवर्षी एक हजार रुपयेही वाढवून देणार; नाना पटोले यांची मोठी घोषणा

"आता हे लोक इव्हेंट ककरत आहेत. जनतेचा पैसा लुटून इव्हेंट करत आहेत. पण भगिनींना बँकेत किती त्रास आहे माहीत आहे का? आम्ही या पेक्षा चांगली योजना आणणार आहोत. आम्ही महालक्ष्मी योजनेच्या नावाने योजना आणू. ३ हजार रुपये देऊ. दरवर्षी १ हजार त्यात वाढवू. आम्ही सक्षम सरकार आणून ही योजना देणार आहोत", अशी मोठी घोषणा नाना पटोले यांनी केली.

लाडकी बहीण योजनेला टफ देणारी योजना आणणार, एवढी रक्कम देणार, दरवर्षी एक हजार रुपयेही वाढवून देणार; नाना पटोले यांची मोठी घोषणा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 2:21 PM

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला. याच योजनेच्या धर्तीवर काँग्रेस राज्यात नवी योजना आणणार आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेला टफ देणारी योजना काँग्रेस आणेल. आम्ही महालक्ष्मी योजना आणू आणि महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देऊ. तसेच प्रत्येक वर्षाला 1000 रुपये वाढवू, अशी मोठी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

“आम्ही या योजनेचं स्वागत केलं आहे. फक्त ती कायम राहावी. भगिनींची दिशाभूल होऊ नये. बँकेत पैसे गेले. बँकेवाल्यांनी ते गायब केले. आता हे लोक इव्हेंट ककरत आहेत. जनतेचा पैसा लुटून इव्हेंट करत आहेत. पण भगिनींना बँकेत किती त्रास आहे माहीत आहे का? आम्ही या पेक्षा चांगली योजना आणणार आहोत. आम्ही महालक्ष्मी योजनेच्या नावाने योजना आणू. ३ हजार रुपये देऊ. दरवर्षी १ हजार त्यात वाढवू. आम्ही सक्षम सरकार आणून ही योजना देणार आहोत. त्यामुळे वडपल्लीवरांना मध्ये आणून खोटं बोललं जात आहे. फडणवीस अधिक खोटं बोलत आहे. एकनाथ शिंदेही नवीन मुल्ला सारखे खोटं बोलत आहेत”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.

नाना पटोले आणखी काय-काय म्हणाले?

“महिलांना काय देऊ शकतो, वर्षाला काय देणार ही भूमिका आम्ही मांडली होती. अजेंड्यात होतं. ही भूमिका आमचीच होती. आमच्या बहिणींकडून महागाईच्या नावाने १०० रुपये घ्यायचे आणि दीड हजार घ्यायचे हे बहिणींना माहीत आहे. आम्ही या पेक्षा चांगल्या योजना आणू. यापेक्षा जास्त पैसे देऊ. कर्नाटकात चांगली योजना आहे. त्याच आणू. आम्ही खिसे कापणार नाही. बहिणींना परवडेल अशी योजना आणू. महागाईवर अंकूश आणू”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“महिलांवरील अत्याचार कमी करू. राज्यातील क्राईम रेट वाढला आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. लहान मुलींनाही सोडलं जात नाही. सत्तेतील लोकांना काय फिलगुड करायचं ते करा. त्याला अडचण नाही. पण राज्यात भगिनी, मुलं , शेतकरी आणि जनतेला सरकारबद्दल तीव्र चिड आहे. पम सरकार टाइमपास करत आहे. आमचा योजनेला विरोध नाही. आम्ही यापेक्षा चांगली योजना आणू. आमदारांना निधी देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही”, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

“अनिल वडपल्लीवार आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. सदावर्ते जसा फडणवीस यांच्यासाठी काम करतो. मी नाव नाही घेत. फडणवीस म्हणतात ना, मी कुठे कोर्टात गेलो. मी कुठे गेलो. हा वडपल्लीवार आमच्या मंत्र्याचा पीएस होता. पीएस कोणीही राहू शकतो. फडणवीस यांचेही अनेक पीएस आहेत. घेणार का जबाबदारी?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....