भाजपलाही नरेंद्र मोदी नको आहेत; नाना पटोलेंचा दावा
इंधन दरवाढीच्या मु्द्दयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (nana patole criticized narendra modi over petrol-diesel hike)
मुंबई: इंधन दरवाढीच्या मु्द्दयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ काही उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने देशाची संपत्तीच विकायला काढली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्ही मोदी चले जावचा नारा दिल्यानंतरही भाजपने त्याला विरोध केला नाही, त्यामुळे भाजपलाही मोदी नको आहेत, असाच त्याचा अर्थ निघतो, असा दावाही पटोले यांनी केला. (nana patole criticized narendra modi over petrol-diesel hike)
तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल
नाना पटोले यांनी टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे राहिले नसून सरकार फक्त काही निवडक उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी काम करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर आले आहेत पण देशात मात्र दर उच्चांकी पातळीवर गेले आहेत. अनेक भागात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. सद्याच्या काळात डिझेल २५ रुपये लिटर आणि पेट्रोल ३५ रुपये लिटर विकायला हवे पण सरकार महाग इंधन विकून नफेखोरी करत आहे. इंधन आणि गॅसचे दर वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असून उद्योगपती मित्रांचा फायदा करत आहे. केंद्रातील भाजप सरकार याच पद्धतीने काम करत राहिले तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल असे पटोले म्हणाले.
भाजपलाही मोदी नकोत
नरेंद्र मोदींनी देशाची संपत्ती विकायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणारे उद्योग कवडीमोल दराने विकले जात आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही ‘मोदी चले जाव’चा नारा दिला. देशातील आणि राज्यातील एकाही भाजप नेत्याने किंवा भक्ताने याला विरोध केला नाही. मोदी देश बरबाद करत आहेत हे त्यांनाही आता कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्याही लोकांना मोदी नको आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (nana patole criticized narendra modi over petrol-diesel hike)
राज्यपालांनी पेच निर्माण केला
राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त असल्याने संवैधानिक पेच निर्माण होणार आहे. राज्यपालांनी १२ नामनियुक्त सदस्यांच्या नावाला मंजुरी दिली नाही, पेच निर्माण करून ठेवला आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना विधिमंडळाच्या समित्या तयार केल्या होत्या. नामनियुक्त सदस्य आल्यावर त्या समित्या पूर्ण होणार होत्या. पण अद्याप सदस्यांच्या नावाला मंजुरी मिळाली नसल्याने समित्यांवरची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विधिमंडळ समित्यांचे जे कामकाज सुरु आहे ते संवैधानिक आहे की असंवैधानिक हा पेच राज्यपालांच्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे, असंही ते म्हणाले. (nana patole criticized narendra modi over petrol-diesel hike)
#LIVE : महत्वाच्या बातम्या #Tv9LIVE https://t.co/3yp6dp0de6
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
संबंधित बातम्या:
…तर लोकलसंदर्भातही पुन्हा एकदा मोठा निर्णय घ्यावा लागेल, अतिरिक्त पालिका आयुक्तांचे सूतोवाच
ठाणे, मुंबईमध्ये प्रशासकीय पातळीवर मोठे बदल, ‘या’ महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
(nana patole criticized narendra modi over petrol-diesel hike)