शिल्पकार जयदीप आपटे संघाशी संबंधित…नाना पटोले यांचा हल्ला

Nana Patole exclusive interview: जयदीप आपटे याची लिंक कुणाशी आहे. त्याची लिंक स्पष्ट होतेय तो संघाचा आहे. संघाच्या माणसालाच जर राज्याची तिजोरी लुटून देत असाल तर काय होणार? त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, ही नौदलाची जबाबदारी आहे. आमची नाही. नौदल म्हणालं, ही सरकारची जबाबदारी दिली. आमची नाही. राज्याचा प्रमुख असं बोलतो.

शिल्पकार जयदीप आपटे संघाशी संबंधित...नाना पटोले यांचा हल्ला
jayant patil
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 2:21 PM

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची निर्मिती शिल्पकार जयदीप आपटे याने केली होती. हा जयदीप आपटे कोण आहे? त्यालाच पुतळा बनवण्याचे काम का दिले.? कारण तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व्यक्ती आहे, असा थेट हल्ला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. ‘टीव्ही ९ मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात त्यांनी हा हल्ला केला.

जयदीप आपटे याची लिंक कुणाशी आहे. त्याची लिंक स्पष्ट होतेय तो संघाचा आहे. संघाच्या माणसालाच जर राज्याची तिजोरी लुटून देत असाल तर काय होणार? त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, ही नौदलाची जबाबदारी आहे. आमची नाही. नौदल म्हणालं, ही सरकारची जबाबदारी दिली. आमची नाही. राज्याचा प्रमुख असं बोलतो.

पोलिसांनी परवानगी दिली असती तर…

आमच्या दैवताचा अपमान झाला. तेव्हा आम्ही पोलिसांना महाराजांना नतमस्तक होण्यसाठी परवानगी मागितली. आम्हाला मोर्चा करायचा नव्हता. पण आम्हाला परवानगी दिली नाही. मुंबईच्या रस्त्यावर दोन पावलंही चालण्यासाठी परवानगी हवी आहे. विरोधकांवर बेभान आरोप केला जात आहे. या सरकारची जायची वेळ आली आहे. शेवटचा हातपाय हलवण्याचं काम हे सरकार आहे.

हे सुद्धा वाचा

शिवाजी महाराज अन् सावरकर यांची तुलना नको

शिवाजी महाराज आणि सावरकर ही तुलना होऊ शकते का. सावरकरांची पुस्तके वाचा. महाराजांबद्दल काय काय बोलले तेही पाहा. मला त्या इतिहासात जायचं नाही. पण सावरकर आणि महाराजांची तुलना होऊच शकत नाही.

अनिल वडपल्लीवर आमचा माणूस नाही

अनिल वडपल्लीवार आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. तो आमच्या मंत्र्याचा पीएस होता. पीएस कोणीही राहू शकतो. फडणवीस यांचेही अनेक पीएस आहेत. त्यांची जबाबदारी ते घेणार आहे का?. आम्ही या योजनेचे स्वागत केले आहे. फक्त ती कायम राहावी. भगिनींची दिशाभूल होऊ नये. बँकेत पैसे गेले. बँकेवाल्यांनी ते गायब केले. आता हे लोक इव्हेंट करत आहेत. जनतेचा पैसा लुटून इव्हेंट केले जात आहेत. आम्ही महालक्ष्मी योजनेच्या नावाने योजना आणू. त्यात ३ हजार रुपये देऊ. दरवर्षी १ हजार त्यात वाढ करणार आहोत, असे नाना पटोले यांनी सांगितले.

जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.