रश्मी शुक्लांबाबतचा अहवाल आलाय, आता पुढे काय होतं ते बघा; नाना पटोलेंचा सूचक इशारा

| Updated on: Mar 26, 2021 | 1:54 PM

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कामकाजाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. (nana patole reaction on rashmi shukla report)

रश्मी शुक्लांबाबतचा अहवाल आलाय, आता पुढे काय होतं ते बघा; नाना पटोलेंचा सूचक इशारा
nana patole
Follow us on

मुंबई: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कामकाजाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. आता पुढे काय होतं ते बघा, असा सूचक इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे रश्मी शुक्लांवर सरकार कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (nana patole reaction on rashmi shukla report)

नाना पटोले आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पटोले यांनी हा सूचक इशारा दिला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा निषेधही नोंदवला. अधिकारी अधिकारी असतात. त्यांनी जनतेसाठी काम करावं की एखाद्या पक्षासाठी हे त्यांनी ठरवावं. अधिकार्‍यांनी कुणाची कठपुतळी होऊ नये, त्यांनी जनतेसाठी काम करावं, असं सांगतानाच काँग्रेसने अधिकार्‍यांचा कधीच असा वापर केला नाही, असं पटोले यांनी सांगितलं.

लोयाप्रकरणाची चौकशी होणार?

यावेळी पटोले यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला इशारेही दिले. न्याायमूर्ती लोया प्रकरण आहे. इतर प्रकरणेही आहेत. त्यावरही आता कारवाई होईल, असं सांगत पटोले यांनी आगामी काळात भाजपची कोंडी करणार असल्याचे संकेत दिले.

राऊत कुणाचे प्रवक्ते?

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेना हा यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएने कुणाला पाठिंबा द्यावा हे ते ठरवू शकत नाही. त्यांनी सल्ले देऊ नयेत असं सांगतानाच संजय राऊत कोणाचे प्रवक्ते आहेत ते आधी त्यांनी जाहीर करावं, मग आम्ही त्यावर बोलू, असंही ते म्हणाले.

चव्हाणांचे दोन आरोप

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर दोन आरोप केले. मोदी सरकारने तीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारने विरोधकांशी चर्चा करून नवीन कायदे करावेत. सध्या हे कायदे दीड वर्षासाठी स्थगिती केले आहेत. त्यामुळे नवीन कायदे तयार करण्यात यावेत. परंतु मोदी सरकारला कृषी अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायची असल्याने सरकार हे करणार नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच कोरोना काळात सरकारला झालेला तोटा भरून काढण्यासाठी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर आकारत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत, मात्र आपल्या देशात किंमती कमी होत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. (nana patole reaction on rashmi shukla report)

 

संबंधित बातम्या:

माझा फोटो दिसला तर लोक लस घ्यायला येणार नाहीत: अजित पवार

हिरेन यांचे रुमाल कुणी पळवले, डायटोम टेस्ट का केली?; आशिष शेलारांचे सवाल

भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांनी माझ्यावर दबाव आणला; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली

(nana patole reaction on rashmi shukla report)