पाच वर्षात संघाला किती वाटा दिला?; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिलं होतं. (nana patole slams devendra fadnavis over parambir singh letterbomb)
मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिलं होतं. त्यावर काँग्रेस का बोलत नाही? काँग्रेसलाही वाटा दिला जात होता का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. फडणवीस यांनाच हप्तेखोरीचा मोठा अनुभव आहे. त्यांनी पाच वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किती वाटा दिला? असा सवाल करतानाच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. (nana patole slams devendra fadnavis over parambir singh letterbomb)
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या आरोपांवर पलटवार केला. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा संघाला जात होता, याची चौकशी करण्याची मागणी आपण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार आहोत, असं पटोले म्हणाले.
फडणवीस विधिमंडळातही खोटे बोलतात
फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे. भाजपाने आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे. परंतु महाराष्ट्राची जनता त्यांचा हा खेळ ओळखून आहे. फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरु आहेत. फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळात सुद्धा खोटे बोलतात, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.
परमबीर सिंग प्रिय कसे?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपावाले टीका करत होते, आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत याची आम्हाला माहिती आहे. खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली त्याचा एफआयआर दाखल करण्यातही परमबीर सिंग यांनी टाळाटाळ केली. त्यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. सध्या सुरु असलेल्या प्रकरणाची हायकोर्टाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे, असं ते म्हणाले.
सिंग यांना निलंबित केले असते
मी सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंग यांनी केलेल्या वर्तणुकीनंतर त्यांची बदली केली नसती तर थेट निलंबित केले असते, असंही त्यांनी सांगितलं. (nana patole slams devendra fadnavis over parambir singh letterbomb)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/363zMEtrB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या:
वडील गिरणी कामगार, चाळीत बालपण गेलं; चंद्रकांतदादां विषयी हे माहीत आहे का?
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास अखेर NIA कडे, ठाणे सत्र न्यायालयाकडून हत्सांतरणाचे आदेश, ATS ला झटका
LIVE | नवी मुंबईच्या अनेक भागात 25 आणि 26 मार्च दरम्यान पाणी पुरवठा बंद
(nana patole slams devendra fadnavis over parambir singh letterbomb)