मॅच फिक्सिंग कोण करायचं हे योग्यवेळी सांगेल, अंगावर आलं तर… नाना पटोले यांचा इशारा कुणाकडे?

Nana Patole | संविधान आणि लोकशाही भीकेने मिळाली नाही. काँग्रेस आणि इतर नेत्यांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळालं आहे. ही व्यवस्था जिवंत राहिली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

मॅच फिक्सिंग कोण करायचं हे योग्यवेळी सांगेल, अंगावर आलं तर... नाना पटोले यांचा इशारा कुणाकडे?
नाना पटोले
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 1:28 PM

मुंबई | दि. 1 मार्च 2024 : महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. राज्यात काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहचले आहे. त्यानंतर काँग्रेस पराभूत होत होते. मी सूत्र घेतल्यानंतर राज्यात काँग्रेसकडे नव्हत्या, त्या जागा आम्ही जिंकल्या. माझ्या पक्षाध्यक्षपदाच्या कार्यकाळात विजय मिळवला. म्हणजे यापूर्वी निवडणुकीत मॅच फिक्सिंग केले होते का? हे जे मॅच फिक्सिंग करणारे होते, त्यांना माझा त्रास होत होत्या. महाराष्ट्ररात काँग्रेस एका खासदारावर कसे पोहचले. मला कोणावर आरोप करायचे नाही, परंतु मला अंगावर घेणाऱ्यांना मी शिंगावर घेणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले यांच्या कार्यशैलीला कंटाळून पक्षातून लोक बाहेर पडत असल्याचा आरोप आता होत आहे. त्यावर टीव्ही९ मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये नाना पटोले यांनी उत्तर दिले आणि पक्षातंर्गत विरोधकांना इशाराही दिला. आता नाना पटोले यांचा हा रोख कोणाकडे होता? त्याची चर्चा रंगली आहे.

साखर कारखान्याची मदत कोणाला

आज साखर कारखान्याना राज्य सहकारी बँकांनी मदत केल्याची यादी आली आहे. त्यात कुणाला भरीव निधी दिला त्यां नेत्यांचे फोटो आले आहेत. त्यामुळे कोण आणि कशासाठी पक्षाकडून बाहेर गेला आणि जात आहे हे स्पष्ट दिसत आहे. सत्तेची मानसिकता ठेवणारी लोकं आणि काम करणारी लोकं यातला फरक दिसत आहे. कोण गेला याचा काही फरक पडत नाही.

हे सुद्धा वाचा

निवडणुका आम्हीच जिंकल्या

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा पुणे शहरातली कसबा मतदार संघाची विधानसभा निवडणूक असेल या जागा भाजपच्या ताब्यात होत्या. त्या आम्ही जिंकल्या आहेत. एखाद्या पक्षाचं मूल्यांकन करायचं असेल तर निवडणुका हेच थर्मामीटर आहे. त्यात काँग्रेस जिंकत आहे. त्यामुळे कोण जातं हा मुद्दा नाही. आमच्या अंगावर जो येईल त्याला कसं शिंगावर घ्यायचं हे आम्हाला माहीत आहे.

अंगावर आलं तर शिंगावर घेईल

नाचता येत नाही अंगण वाकडं काही लोकांना वाटतं. काही लोक पक्षाच्या भरवश्यावर कुटुंब चालवत असतात. ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या काँग्रेसकडे नव्हत्या. त्या आम्ही जिंकल्या. मॅच फिक्सिंग केलंय का. मी आरोप करत नाही. पण ज्यांना माझ्या कामाचा त्रास होत असेल ते आरोप करणारच. कारण आम्ही हरणाऱ्या जागाही जिंकल्या आहेत. कुठेला नेता कशासाठी जात आहे, ते आपण योग्य वेळेस मांडू. अंगावर आलं तर शिंगावर घेईल.

या देशाच्या प्रक्रियेत न्याय दिला पाहिजे ही भूमिका घेऊन राहुल गांधी मणिपूरला येणार आहेत. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याचं उत्तरदायित्व आपलं आहे. संविधान आणि लोकशाही भीकेने मिळाली नाही. काँग्रेस आणि इतर नेत्यांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळालं आहे. ही व्यवस्था जिवंत राहिली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत.

हे ही वाचा

मोदींना भेटल्यानंतर उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं, त्या गुप्त बैठकीत काय घडलं?; सुनील तटकरे यांनी सांगितलं पडद्यामागचं ‘राज’कारण

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.