विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड; नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Aug 01, 2023 | 8:46 PM

एका तडफदार नेतृत्वाला हायकमांडने संधी दिल्याचं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं. विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीवर नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली.

विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड; नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी विरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले. सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांपैकी काँग्रेसचे जास्त आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावे, असा दावा काँग्रेसने केला होता. त्यानंतर काँग्रेसचा नेता विरोधी पक्षनेता होईल, हे ठरलं. पण, नावावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. अखेर आज बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवर यांचे नाव जाहीर केले. विजय वडेट्टीवार हे आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करतील.

आमच्यात वाद असल्याच्या बातम्या भाजपने पसरवल्या

एका तडफदार नेतृत्वाला हायकमांडने संधी दिल्याचं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं. विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीवर नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली. आमच्यात वाद आहेत, अशा बातम्या भाजपनं पसरवल्याचंही पटोले यांनी म्हंटलं. आम्ही पक्षात एकजुटीनं काम करत आहोत, असं ते म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, आम्ही एकजुटीने पक्षामध्ये काम करत आहोत. चौथ्या नंबरचा पक्ष महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाला आहे. भाजपकडून अशा बातम्या पसरवण्याचं काम केलं जातं. आमचा नेता मजबूत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हायकमांडनं दिलं असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

विजय वडेट्टीवार यापूर्वीही होते विरोधी पक्षनेते

बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभेत आमचे ४५ सदस्य आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. उद्या विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून घोषित करण्यात यावं, हे सांगितलं आहे.

विधीमंडळ काँग्रेसचा नेता हे पद माझ्याकडे होतं. मला ती जबाबदारी सांभाळण्यासाठी सांगण्यात आलं आहे. विजय वडेट्टीवार यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी राज्याचे विविध विभाग सांभाळले आहेत. २०१९ मध्ये विरोधी पक्षनेतेपद विजय वडेट्टीवार यांनी समर्थपणे सांभाळलं होतं. तसेच राज्यात प्रचाराची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळली होती, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलं.