तू जिथे म्हणशील तिथे येतो, संरक्षण इथेच सोडतो; नारायण राणे पूर्वीच्याच जोशात, संजय राऊत यांना ओपन चॅलेंज

| Updated on: Jan 07, 2023 | 10:44 AM

मला पोलिसांनी जबरदस्तीने संरक्षण दिलं हे राऊतांना हे माहीत नाही. कारण राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते. शिवसेनेविरोधात लोकप्रभेत लेख लिहित होते.

तू जिथे म्हणशील तिथे येतो, संरक्षण इथेच सोडतो; नारायण राणे पूर्वीच्याच जोशात, संजय राऊत यांना ओपन चॅलेंज
नारायण राणे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकटं फिरण्याचं आव्हान दिलं होतं. नारायण राणे यांनी राऊत यांचं हे आव्हान स्वीकारलं आहे. तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते; असं खुलं आव्हानच नारायण राणे यांनी दिलं आहे. त्यामुळे राणे आणि राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोपही राणेंनी करून खळबळ उडवून दिली आहे.

भाजप आमदार राम कदम यांच्याकडून काशी यात्रेकरुंसाठी मोफत ट्रेन सोडण्यात आली आहे. काशी आणि सारनाथचं दर्शन घडवण्यासाठी ही ट्रेन सोडण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या ट्रेनला हिरवा कंदील दिला. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या आव्हानाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी हे विधान केलं.

हे सुद्धा वाचा

कुणाला चॅलेंज देतोय? एकटा फिरा असं मला राऊत चॅलेंज देतो. मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही. 1990सालापासून मला संरक्षण आहे. मी ज्यांच्याविरोधात लढलो. त्यात बाहेरचे लोक होते. त्यांच्या विरोधात लढलो म्हणू मला 90 सालापासून मला संरक्षण दिलं आहे. पोलिसांनी मला जबरदस्तीने मला संरक्षण दिलं आहे, असं राणे म्हणाले.

मला पोलिसांनी जबरदस्तीने संरक्षण दिलं हे राऊतांना हे माहीत नाही. कारण राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते. शिवसेनेविरोधात लोकप्रभेत लेख लिहित होते. तुम्हाला आज सांगतो. संजय राऊत तू जिथं म्हणशील तिथे येतो. आजच संरक्षण सोडतो. बघुया, असं आव्हानच त्यांनी दिलं.

पण एक ना एक दिवस मी राऊत समोर संरक्षण सोडून जाईल. मी एकटाच जाईन. मला काही फरक पडत नाही. माझा इतिहास शिवसेना घडवण्याचा आहे. शिवसेना संपवण्याचा नाहीये. माझ्या वाटेला येऊ नको.

तू सांगशील आज तर आज येईल. उद्या म्हणशील तर उद्याही येईल. उद्या मी त्रिपुराला आहे. त्रिपुराला मीही देवीच्या दर्शनाला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.