Narayan Rane : GDP मध्ये माझ्या खात्याचं 30 टक्क्यांचं योगदान, नारायण राणे यांचा दावा
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच पुन्हा शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. खास करून संजय राऊत (Sanjay Raut) यांचा राणे शैलीत त्यांनी समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या खात्याचं GDP मध्ये 30 टक्क्यांचं योगदान असल्याचा दावा घेत आहे.

मुंबई : राज्यात विविध मुद्द्यांवरून महोल तापला असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच पुन्हा शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. खास करून संजय राऊत (Sanjay Raut) यांचा राणे शैलीत त्यांनी समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या खात्याचं GDP मध्ये 30 टक्क्यांचं योगदान असल्याचा दावा केला आहे. संसदेचे आधिवेशन संपले त्यामुळे आज पत्रकार परिषद घेत आहे, अशी माहिती यावेळा राणेंकडून देण्यात आली. केंद्रात नारायण राणे यांच्याकडे लघू आणि सुक्ष्म उद्योग खातं आहे. त्या खात्याचं देशाच्या एकूण जीडीपीत मोठं योगदान असल्याचा दावा आज राणेंनी केला आहे तर शिवसेनेचा त्यांनी पुन्हा जुन्या स्टाईलनं समाचार घेतला आहे.
महाजारांच्या नावाने महाराष्ट्र लुटला
सध्या माहाराष्ट्रात फार राजकीय घडामोडी सुरू आहेत. उत्सव सुरू आहेत, स्वागतं सुरू आहेत. हे पाहील्यावर कोणत्या कार्याचं स्वागत व्हायला हवे याचा मोठा प्रश्न पडत आहे, असा राऊतांना अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे. तसेच छत्रपती शिवाजी माहारांजाचं नाव घेऊन माहाराष्ट्र लुटला जात आहे. संपादक पदावरचा माणूस पत्रकार परिषद घेऊन शिव्या घालत आहे. यावरून त्या माणसाचं आणि त्या पत्रकारीतेचे काय पावित्र राहत आहे, असे म्हणते त्यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला. तसेच धमकी न देता धमकीच्या केसेस महाराष्ट्रात लावल्या जात आहेत. 40 बसा सोडल्यातर कोण होत शिवसेनेचं राऊतांच्या स्वागताला, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
संजय राऊतांनी काळा पैसा जमवला
संजय राऊत यांना बाळासाहेंबाचा विसर पडलाय. या राज्याला मुख्यमंत्रीच नाही. काही कमिटमेंट नाही, कसलाही कायदा सुव्यवस्था नाही. एसटी कर्मचाऱ्यांकडे कुणाचं लक्ष नाही, म्हणत त्यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.तसेच राष्ट्रवादीचं आपलं मस्त चाल्लय. संजय राऊतांचे बॅास उद्धव ठाकरे नाही तर पवार साहेब आहेत. राऊतांनी काळे पैसे जमा केले आणि मालमत्ता बनविली, असा थेट आरोपही त्यांनी केला आहे. संजय राऊत गुरूवारी मुंबईत दाखल झाल्यावर शिवसैनिकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. त्यावरूनच राणेंनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
ST Andolan Mumbai: ज्या भाषणामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले, तो अॅड. सदावर्तेंचा बाईट ऐका