Narayan Rane vs Shiv Sena : इंग्रजीतल्या ‘त्या’ प्रश्नासंबंधी शिवसेनेच्या टीकेला नारायण राणेंचं उत्तर, म्हणाले…
डीएमके नेत्या कमिमोळी (Kanimozhi) यांनी लोकसभे(Loksabha)त त्यांना कोरोना परिस्थितीत उद्योग क्षेत्र आणि त्यांचे चालक यासंबंधी प्रश्न इंग्रजीतून विचारला होता. मात्र प्रश्नाचं उत्तर देताना राणे अडखळले. यावरून शिवसेने(Shiv Sena)नं त्यांना लक्ष्य केलं होतं.
मुंबई : आकडेवारीसह न पाहता उत्तर दिलं. कोरोनात कारखान्यांच्या स्थितीबाबत तो प्रश्न होता, असं स्पष्टीकरण भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) यांनी दिलंय. डीएमके नेत्या कनिमोळी (Kanimozhi) यांनी लोकसभे(Loksabha)त त्यांना कोरोना परिस्थितीत उद्योग क्षेत्र आणि त्यांचे चालक यासंबंधी प्रश्न इंग्रजीतून विचारला होता. मात्र प्रश्नाचं उत्तर देताना राणे अडखळले. यावरून शिवसेने(Shiv Sena)नं त्यांना लक्ष्य केलं होतं.
‘संजय राऊत कोणत्या पक्षात?’ शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नारायण राणे यांनी टीका केलीय. ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी(NCP)चे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दिल्लीत ते राष्ट्रवादीच्याच कार्यालयात असतात. त्यांना शिवसेनेविषयी कोणतीही निष्ठा नाही, प्रामाणिक नाही. ते कधी होते शिवसेनेत, काय केलं पक्षासाठी, असा सवाल त्यांनी केलाय. ते बोलतात तसे नाहीत. एका खासदाराला, वृत्तपत्राच्या संपादकाला अशाप्रकारची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. एसटी कर्मचारी संपा(ST Workers Strike)वरून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab)यांच्यावरही टीका केली.
‘सरकार मोदींचंच’ कोरोनासह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार चांगलं काम करतंय. ओमिक्रॉन या नव्या कोरोनाच्या विषाणूसंदर्भातही विविध प्रभावी उपाययोजना केंद्राकडून केल्या जाताहेत. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं चाललाय. अधिवेशन सुरळीत सुरू आहे, शएतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय, असे ते म्हणाले. हे सरकार मोदींचं सरकार आहे, ते पुढचे २५ वर्ष हलतं नाही, असं वक्तव्य भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय. यावेळी त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)वरही टीकास्त्र सोडलं. आपल्या खात्याचा विस्तार वाढावा, अधिकाधिक रोजगार निर्मिती खात्याच्या माध्यमातून व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.