Sanjay Raut Vs Bjp : राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे, तर राऊतही म्हणाले होय मी राष्ट्रवादी !

संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. त्याला आता संजय राऊतांनीही लगेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. माझा डोळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे, असे उत्तर दिले आहे.

Sanjay Raut Vs Bjp : राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे, तर राऊतही म्हणाले होय मी राष्ट्रवादी !
संजय राऊत य़ांचा राणेंवर पलटवार
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 6:19 PM

मुंबई : काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची (Narayan Rane) ताबडतोब पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी संजय राऊतांची (Sanjay Raut) कुंडलीच माडल्याचा दावा केला. संजय राऊत हे बाळासाहेब (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे बोलले आहेत. बाळासाहेबांनी इशारा केला असता तर संजय राऊत राहिलेही नसते. अशी घणाघाती टीका केली. तसेच संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. त्याला आता संजय राऊतांनीही लगेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. माझा डोळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. शिवसेनेचा प्रसार जोरात होत आहे. येत्या लोकसभेपर्यंत शिवसेनेचा एवढा विस्तार होईल की शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

भाजपवाले बेरोजगार होतील-राऊत

एवढच नाही तर 2024 च्या निवडणुकीनंतर भाजपमधील अनेकजण बरोजगार झालेले असतील, असा टोलाही राणेंना राऊतांनी लगावला आहे. तर राणेंवर कोकणातल्या दुसऱ्या राऊतांनीही जोरदार प्रहार चढवला आहे. नारायण राणेंची पत्रकार परिषद संपल्या संपल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणेंचा समाचार घेतलाय. त्यांनी नारायण राणे यांनी मोदी आणि भाजपवर टीका केल्याच्या व्हिडिओंची मालिकाच मीडियासमोर मांडली आहे. फक्त नारायण राणेच नाही तर त्यांनी नितेश राणे यांचाही समाचार घेतला आहे. नितेश राणे यांनी आरएसएसवर केलेली टीकाही त्यांनी दाखवली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ पॅटर्न सक्रिय झाला आहे.

राणेंची नेता होण्याची लायकी नाही-राऊत

विनायक राऊत फक्त राणेंवर बोलून थांबले नाहीत तर त्यांनी किरीट सोमय्या यांचाही समाचार घेतला आहे. किरीट सोमय्या यांनी राणेंवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोपही व्हिडिओच्या माध्यामातून विनायक राऊत यांनी दाखवले आहेत. राणेंवर आरोप झाल्यानंतर राणे चोर दाराने पळून दिल्लीला गेले. आणि दिल्लीत जाऊन भाजपच्या बड्या नेत्यांचे पाय धरले असा घणाघात त्यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा दाखल देत शिवसेनेने नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले असले तरी त्यांना कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा नेता म्हटले नाही असे सांगत नेता होण्याची त्यांची लायकी नाही म्हणत पत्रकार परिषदेत राणे कुंटुंबीयांवर टीका केली आहे. त्यामुळे राज्यात सध्या पत्राकर परिषदांचा सपाटा दिसून येत आहे.

राऊत आणि शिवसेना नेतृत्वावरही दबाव, पत्रकार परिषदेतून शिवसेना नेते गायब का? सर्वच भाजप नेत्यांचा एकच सवाल!

Narayan Rane vs Shivsena : ‘मिलिंद नार्वेकर म्हणजे तोच का जो ‘बॉय’चं काम करायचा, राणेंनी ‘मातोश्री’तला तो प्रसंग सांगितला

Video| तर कदाचित तू नसतास, नारायण राणेंचे राऊतांवर गंभीर आरोप, कुंडली मांडण्याची धमकी

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.