नारायण राणे पुन्हा घसरले; संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचा असा घेतला समाचार

आम्ही काय गुच्छ घेऊन जायचो? आम्ही कुठे कुठे काय काय पोहोचवलं. आता सांगायला लावू नकोस. कारण आमचं साहेबांवर प्रेम होतं.

नारायण राणे पुन्हा घसरले; संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचा असा घेतला समाचार
नारायण राणे, संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 9:36 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा चांगलाच समाचार घेतला. नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, इथे एक जवळच चिम्पाट संपादक म्हणून आहे. तू कोणाला सांगतो येऊन दाखव म्हणून, असा सवालही नारायण राणे यांनी संजय राऊत यांना केला. त्या उद्धव ठाकरेचे शिवसेनेत योगदान किती ?, असंही त्यांनी विचारलं. आताचे शिवसैनिक आयत्या बिळावर नागोबा आहेत. शिवसेना मोठी करण्यात माझं योगदान आहे, असंही नारायण राणे यांनी सांगितलं. संजय राऊत यांना म्हणाले, संपादक आहेस तर चांगलं लिही. हा खासदार हे माझं पाप आहे, अशी कबुलीही नारायण राणे यांनी दिली. त्यावेळचा किस्साही नारायण राणे यांनी सांगितला.

इलेक्शन यादीत नाव नव्हते

ते म्हणाले, एकदा बाळासाहेब यांनी मला बोलावलं. याला संपादक बनव असं सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी शिवालयमध्ये संजय राऊतच्या विरोधात उमेदवार तयार ठेवला होता. पण मला बाळासाहेब यांनी याचे नाव सांगितले होते.

संजय राऊत याचे इलेक्शन यादीत नाव नव्हते. काँग्रेसच्या रोहिदास पाटील यांनी विरोध केला. हा खासदार बनवायला खर्च मी केला. खर्च मी सांगणार नाही. आणि आता हा मला विचारतो. आता याची रवानगी जेलमध्येच. एवढी हेराफेरी आहे ना याची, असंही नारायण राणे यांनी सुनावले.

नारायण राणे म्हणाले, कोणाच्या अंगावर केसेस नाहीत. शिवसेनेचे 40 आमदार दिवसा निघून जातात. आता काय अवस्था आहे. जातात काय येतात काय आणि दुसऱ्यांना खोके म्हणतात.

आमचं साहेबांवर प्रेम होतं

आम्ही काय गुच्छ घेऊन जायचो? आम्ही कुठे कुठे काय काय पोहोचवलं. आता सांगायला लावू नकोस. कारण आमचं साहेबांवर प्रेम होतं. आणि हे अडीच वर्ष बसले मुख्यमंत्री बनून पण काय केलं ?

गडकरी यांच्याकडून टेंडर काढलं

कोकणसाठी फक्त बढाया केल्या. विमानतळ मी केलं. विनायक राऊत विरोध करत होते. कारण त्याला टक्केवारी हवी होती. भाजपची देशात सत्ता आली. नितीन गडकरी यांच्याकडून टेंडर काढलं आणि सिंधुदुर्गचे रस्ते केले, असंही नारायण राणे यांनी सांगितलं.

मराठी माणसासाठी कोण काम करताय हे पाहा. त्यामुळे संजय राऊत तोंड बंद कर. मी देशात काम करतोय. तू खाल्लेल्या मिठाला जाग. मी आता सिंधुदुर्गमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल सुरु करतोय. कारण मी राजकारणी आहे. पण मी व्यावसायिकसुद्धा आहे. नारायण राणे शिवसेनेत असताना शिवसेनेमधून कोणी बाहेर जात होतं का. आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत, याची आठवणही नारायण राणे यांनी करून दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.