मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांना काल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज सकाळीच वकिलांची एक टीम आज राणेंच्या घरी आली. या वकिलांनी राणेंशी बराचवेळ चर्चा केली. आज राणेंचे वकील कोर्टात याचिका दाखल करून राणेंवरील सर्व खटले रद्द करण्याची मागणी करणार आहे. (Narayan Rane to approach Bombay high court against cases)
सकाळीच वकिलांची एक टीम राणेंच्या घरी आली. अॅड. अनिकेत निकम आणि त्यांचे सहकारी राणेंच्या घरी आले होते. राणेंच्या कालच्या याचिकेत त्यांची सही नव्हती. त्यामुळे त्यांची सही घेऊन नव्याने याचिका दाखल करणार आहे. राणेंविरोधात पुणे, नाशिक, महाड आणि ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. हे खटले रद्द करण्याची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात येणार आहे. कागदपत्रांची पुर्तता करून राणेंच्या घरून वकिलांची टीम बाहेर पडली. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, काल जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं राणेंना काही अटी घातल्या आहेत. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.
नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांना दुपारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथून त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर राणेंना रात्री 8.35च्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणे स्वत:च्या गाडीने आले होते. त्यांच्यासोबत नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते. राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे. (Narayan Rane to approach Bombay high court against cases)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 25 August 2021https://t.co/rYEwbu4WZQ#NarayanRane #MahafastNews #MarathiNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2021
संबंधित बातम्या:
नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर!
(Narayan Rane to approach Bombay high court against cases)