“नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट वेळ होती तेव्हा…;” उद्धव ठाकरे यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. राजधर्माचं पालन झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे होते, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट वेळ होती तेव्हा...; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' प्रसंग
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 6:43 PM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी सुभाष देसाई, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, सुनील प्रभू हेही उपस्थित होते. उत्तर भारतीयांशी बोलताना मन की बात नको, दिल की बात हवी, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. उत्तर भारतीयांशी नातं मजबूत करायला आलो असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ऐकमेकांचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे, असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर वाईट वेळ होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा बचाव केला होता, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. राजधर्माचं पालन झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे होते, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हिंदुत्वाची साथ सोडली नाही

२०१४ मध्ये त्यांनी युती तुटली. आम्ही भाजपची साथ सोडली. हिंदुत्वाची साथ सोडली नाही. एकदुसऱ्या विरोधात भाजपचे नेते लढवत आहेत. असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

तुमची मदत हवी आहे

मला तुमची मदत हवी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात केलं. गळात पट्टा बांधून गुलामी करणं हे शिवसेनाप्रमुखांनी मला शिकविलं नाही. मी महाविकास आघाडीत गेलो, याचा अर्थ मी हिंदुत्व सोडलं असा होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बोहरा समाजाच्या किचनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी रोटी शेकली. तर काही नाही. पण, हेचं मी केले असते तर मला विरोध केला असता असंही ठाकरे म्हणाले. पाहण्याचा चष्मा बदलविला गेला पाहिजे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसैनिकांच रक्त कुणाला जात हे पाहत नाही

आमच्या मनात प्रत्येकांच चांगलं व्हावं, असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री असताना कोरोनाचं संकट आलं होतं. अंधार दिसत होता. पण, मी माझं कर्तव्य बजावलं. शिवसैनिक रक्तदान करतात. तेव्हा ते रक्त कुणाला जातं हे आम्ही पाहतं नाही. ते उपयोगी होते की, नाही, यवढंच बघीतलं जात.

हे घोड्याला मिठी मारायला सांगतील

एकदुसऱ्यांशी लढवत ठेवायचं हे आमचं हिंदुत्व नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. आम्ही घोड्यावर बसून राहू. तुम्ही घोड्याच्या लाता खा. आम्ही घोड्यावर बसून राहू. काऊ हग डे होणार होतं. तसं उद्या हे घोड्याला मिठी मारायला सांगतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.