महापुरुषांच्या फोटोंमध्ये नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्ते यांची नेमकी भूमिका काय?

गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत आज एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो त्यांनी महापुरुषांच्या फोटोंजवळ लावला होता. त्यांनी त्यांच्या या कृतीवर भूमिका देखील मांडली.

महापुरुषांच्या फोटोंमध्ये नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्ते यांची नेमकी भूमिका काय?
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 6:14 PM

मुंबई : निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत महापुरुषांच्या फोटोंसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो लावण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला. सदावर्ते यांनी महापुरुषांच्या फोटोंच्या बाजूला नथुराम गोडसेचा फोटो लावल्याने चर्चांना उधाण आलंय. तर सदावर्तेंनी नथुराम गोडसे याचा फोटो का लावला? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता”, असं वक्तव्य सदावर्तेंनी केलं.

“आपल्याला जो फोटो दिसतोय तो नथुराम गोडसे यांचा आहे. मला या महाराष्ट्राला, देशाला, हिंदुस्तानला आणि तमाम संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की, मी वकील होतो. त्याचबरोबर संविधानाचा अभ्यासक आहे. संविधानात डॉक्टरेट पदवी घेतलेला माणूस म्हणून मला सांगायचं आहे, नथुराम गोडसे यांच्यासोबत फाशीची ट्रायल झाली होती. नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. मला मत मांडण्याचा अधिकार आहे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

‘नथुराम पळून गेले नाहीत’

“मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. नथुराम गोडसे यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना न्याय मिळालेला नाही. मी नथुराम गोडसे यांचा फोटो आज आंबेडकर, शिवरायांसोबत लावलाय. मला आज प्रश्न विचारायचा आहे. मी संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांची जी ट्रायल झाली होती त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. नथुराम पळून गेले नाहीत. त्यांनी ट्रायल फेस केली. पण नथुराम यांना त्यावेळेस न्याय मिळाला नाही”, अशी भूमिका सदावर्ते यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

‘शरद पवारांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करणार’, सदावर्तेंचा घणाघात

गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. “अहो शरद पवार, उत्तर द्या. “माजी मुख्यमंत्री उत्तर द्या. तुमच्यात समर्थन किंवा विरोध करण्याचं काहीच नाही. तुम्ही किती षंढ आहात हे तुम्हाला जनता दाखवेल. औरंग्याचं प्रेम तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. ही स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. पवारांमुळे एकदाही या कष्टकऱ्यांना अध्यक्षपद मिळालं नाही”, असा दावा सदावर्तेंनी यावेळी केला.

“शिंदे सरकार आलं आणि पवारांच्या घरावरील हल्याच्या खोट्या गुन्ह्यात दाबलेल्या लोकांना पुन्हा नोकरी मिळाली””, असंही ते यावेळी म्हणाले. “शरद पवारांचा वैचारिक व्हायरस, म्हणे शरद पवरांना धमकी दिली, आणि मागणी करायला कोण गेलं? तर त्यांची मुलगी. यांना कोण धमकी देणार? दाऊद इब्राहिम कोणाच्या काळात फळला-फुलला? म्हणून येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये शरद पवार वैचारिक वायरस, त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेऊ. आम्ही उद्यापासून रॅली काढणार आहोत”, असं सदावर्तेंनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.