VIDEO: राज्य सरकार आघाडीच्या राजकारणाची शिकार झाल्यानेच महिला आयोगाची स्थापना नाही; राष्ट्रीय महिला आयोगाची टीका

साकीनाकामधील बलात्कार पीडीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे. महिला आयोगाच्या टीमने मुंबईत येऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. (National Commission for Women)

VIDEO: राज्य सरकार आघाडीच्या राजकारणाची शिकार झाल्यानेच महिला आयोगाची स्थापना नाही; राष्ट्रीय महिला आयोगाची टीका
chandramukhi devi
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 12:58 PM

मुंबई: साकीनाकामधील बलात्कार पीडीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे. महिला आयोगाच्या टीमने मुंबईत येऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्य सरकार आघाडीच्या राजकारणाची शिकार झाली आहे. त्यामुळेच राज्यात महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही, अशी टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी केली आहे. (national women commission slams maharashtra government over Sakinaka Rape Incidents)

चंद्रमुखी देवी आणि त्यांची टीम मुंबईत आली आहे. या टीमने साकीनाका पोलीस ठाणे आणि राजावाडी रुग्णालयात जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या स्थापनेत एवढा उशीर का होत आहे? आयोग का स्थापन केलं जात नाही हे कळत नाही. हा महिलांशी संबंधित आयोग आहे. संवेदनशील मुद्दा आहे. लवकर आयोग स्थापन करायला हवा. राज्य सरकार आपल्या आघाडीच्या राजकारणाची शिकार झाली आहे. त्यामुळेच त्यांना महिला आयोगाच्या स्थापनेत इंटरेस्ट नाही. या संस्थांचं पुनर्गठन करावं, त्यात सदस्य नियुक्त करावेत यामध्ये सरकारला काडीचा रस नाही, अशी टीका चंद्रमुखी देवी यांनी केली आहे.

राज्य महिला आयोग नसल्याने काहीच सहकार्य नाही

राज्य महिला आयोग ही महत्वाची संस्था आहे. पण दोन वर्षापासून राज्यात महिला आयोगाची स्थापनाच झालेली नाही. आम्हाला अनेक कामानिमित्ताने महिला आयोगाशी संपर्क साधावा लागतो. पण इथे महिला आयोगच नसल्याने कुणाशीच संपर्क साधता येत नाही. गेल्या दीड वर्षात आम्ही महामारीच्या काळात देशातील सर्व राज्यांतील महिला आयोगाशी संपर्क साधला. त्या राज्यातील पीडित महिलांना मदत केली. पण महाराष्ट्रात आयोगच नसल्याने आम्हाला त्यांचं सहकार्य मिळू शकलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

पोलीस आयुक्तांचं ते विधान चुकीचं

मुंबईत भररस्त्यावर महिलेवर बलात्कार होतो ही अत्यंत धक्कादायका घटना आहे. पण, आम्ही सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही असं पोलीस आयुक्त विधान करतात ते अत्यंत निंदनीय आहे. पोलीस सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही हे आम्हालाही कळतं. पण पोलिसांचा एक धाक असतो, पोलिसांची दहशत असते, त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होत असतो, तो निर्माण करायला हवा. ते न करता अशी विधान करणं चुकीचं आहे, असं सांगतानाच महिलांवर अत्याचार होत आहेत. याचा अर्थ गुन्हेगारांचं मनोबल वाढलं आहे. त्यांच्यावर कायद्याचा धाक राहिला नाही. पोलिसांचा काही धाक नाही. त्यामुळेच ते अशी कृत्य करत आहेत, असं त्या म्हणाल्या.

उद्याच अहवाल देणार

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. महिलांच्या चारित्र्यावर बोलू नये. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांनी महिलांनी घाबरून जाऊ नये. दुर्देवाने काही घटना घडल्यास महिलांनी न घाबरता त्याची तक्रार करावी, असं आवाहन करतानाच आज आम्ही साकीनाका बलात्कार प्रकरणाची माहिती घेतली आहे. उद्याच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि केंद्र सरकारला रिपोर्ट देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. (national women commission slams maharashtra government over Sakinaka Rape Incidents)

संबंधित बातम्या:

VIDEO: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, गृहमंत्र्यांकडे मागणी करणार: नवाब मलिक

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

‘त्या’ घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं; संजय राऊत विरोधकांवर संतापले

(national women commission slams maharashtra government over Sakinaka Rape Incidents)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.