New Mumbai Airport: नवी मुंबईतील विमानतळावर हवाईदलाच्या विमानांची भरारी, धावपट्टीची चाचणी यशस्वी
भारतीय हवाईदलाचे 'सी 295' विमान विमानतळावर लँण्डींग झाले आहे. लँण्डींग पूर्वी विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला 'वॉटर सॅल्यूट' करण्यात आले.
नवी मुंबईकरांच्या प्रतिक्षेतील असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली. भारतीय हवाईदलाचे ‘सी 295’ विमान विमानतळावर लँण्डींग झाले आहे. लँण्डींग पूर्वी विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आले. ‘सी 295’ विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर उतरले. या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्यात आले. परंतु त्यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान या विमानतळावरुन मार्च २०२५ महिन्यात देशांतर्गत विमाने सुरु होणार असून आंतरराष्ट्रीय विमाने जून २०२५ पासून सुरु करण्याचा मानस सिडकोचे अध्यक्ष अन् आमदार संजय शिरसाट यांनी दिले.
विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे
विमानाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टीची पाहणी केली. तसेच विमानाची पाहणी केली. हवाईदलाचे हे मोठे विमान आहे. विमानतळ उभारण्यासाठी अनेक अडचणी आल्या. त्या सर्व अडचणींवर मात करुन विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु होते.
350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
नवी मुंबई विमानतळावरील एक धावपट्टी तयार झाली आहे. त्याची चाचणी घेण्यात आली आहे. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहे. विमानतळावरील 4 टर्मिनलवर जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. तसेच या विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे. सिडकोकडून हे विमानतळ उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळावर 4 टर्मिनल बिल्डिंग आहेत. मात्र कुठेही चेक इन केले तरी प्रवाशांना त्यांच्या फ्लाईटपर्यंत पोहचता येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान धावपट्टीवर उतरताच अभिनंदन केले. यावेळी हवाईदलाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. ‘सी 295’ विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर यशस्वीपणे उतण्याचा क्षण अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवला.