नवी मुंबई : नवी मुंबईत घरफोडी प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरांकडून 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोरोना काळात दुकाने बंद होता त्याच्या फायदा चोरट्याने घेत कोपरखैरणे आणि तळोजा इथे दुकानात घरफोडीच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. (Navi Mumbai police arrested two burglars)
या गुन्ह्यात सराईत सोनसाखळी चोराचा समावेश असल्याची शक्यता होती. त्यानुसार गुन्हे शाखा 1 चे पथक गुन्हेगारांच्या मागावर होते. यादरम्यान काही संशयित गुन्हेगार तुर्भे रेल्वेस्थानक जवळ येणार असल्याची माहिती हवालदार बालाजी चव्हाण आणि संतोष मिसाळ यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी सहायक निरीक्षक राहुल राख, रुपेश नाईक, हर्षल कदम, हवालदार रोहिदास पाटील, बालाजी चव्हाण, शशिकांत जगदाळे, संतोष मिसाळ, धनाजी भांगरे व दिपक मोरे यांचे पथक करण्यात आले होते.
या पथकाने रविवारी तुर्भे स्थानकाबाहेर सापळा रचला होता. यावेळी दोघेजण त्याठिकाणी एक गोणी घेऊन संशयास्पद वावरताना आढळून आले. यामुळे पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडील गोणीमध्ये चोरीचे मोबाईल व कपडे आढळून आले. (Navi Mumbai police arrested two burglars)
तळोजा येथील उमेर अहमद बाऊद्दीन व कोपरखैरणेतील अविनाश कोरडे यांच्या दुकानातून त्यांनी हा माल चोरल्याची त्यांनी कबुली दिली. यानुसार त्यांच्याकडून 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सह आयुक्त डॉ. बी. जी. शेखर यांनी दिली. त्यात 52 मोबाईल, स्पीकर, हेडफोन तसेच कपड्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी चोरांना अटक करण्यात आलं असून रिझवान खान (28) व जावेद शेख (22) अशी आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघेही कल्याण परिसरात राहणारे असल्याचे सह आयुक्त शेखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोपरखैरणे इथल्या अविनाश कोरडे यांनी कर्ज काढून नवीनच कपड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. अशातच घरफोडी झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळलं होतं. परंतु गुन्हे शाखा पोलिसांनी वेळीच या गुन्ह्याची उकल करून काही प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल असून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती नवी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त बि. जि.शेखर यांनी दिली.
इतर बातम्या –
VIDEO | Pratapgad | प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला 360 वर्ष पूर्ण, 360 मशालींच्या प्रकाशात लखलखला गड#Pratapgad pic.twitter.com/EQMwLb5ceT
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
(Navi Mumbai police arrested two burglars)