महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंपाठोपाठ नवनीत राणा यांचेही अमित शहांना पत्रं

भाजप नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. (navneet rana demands president rule in Maharashtra)

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंपाठोपाठ नवनीत राणा यांचेही अमित शहांना पत्रं
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 5:01 PM

मुंबई: भाजप नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी या पत्रातून केली आहे. (navneet rana demands president rule in Maharashtra)

खासदार नवनीत राणा यांनी 8 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची होती. ही कार चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात केली होती. तिच कार अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्यासह सापडली होती. याप्रकरणी हिरेन यांची चौकशीही करण्यात आली होती. ते चौकशीला सहकार्य करत होते. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात होती. त्याबाबत हिरने यांनी ठाकरे सरकारकडे तक्रारही केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणीही केली होती. मात्र, त्यानंतर हिरेन यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नवनीत राणा यांनी या पत्रातून दिली आहे.

उद्योगपतींसह सामान्य जनता असुरक्षित

अंबानी हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचं मोठं योगदान आहे. देशातील हजारो तरुणांना ते रोजगार देतात. एवढ्या मोठ्या उद्योगपतीला धमकी मिळते. त्यावरून उद्योगपतींसह सामान्य लोकांची संरक्षण करण्यास राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे. नवनीत राणा यांच्या या पत्राला शहा यांनी उत्तर दिलं आहे. तुमचं पत्रं मिळालं. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी मिळणे आणि हिरेन मृत्यूप्रकरणाशी संबंधित तुमचं पत्रं आहे, असं शहा यांनी या पत्रात म्हटलं आहे.

नारायण राणेंचीही राष्ट्रपती राजवटीची मागणी

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात आहे. कुणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असं सांगतानाच आज कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही आणि पण भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आल्याचं राणे म्हणाले.

दिशा सालियानपासून ते मनसुखपर्यंतची चौकशी करा

दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दिशाच्या घरी तिचे काही मित्र गेले होते. त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यातच तिची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्रीही उपस्थित होता, असा दावा करतानाच दिशा सालियन प्रकरणापासून ते सुशांतसिंग ते मनसुखप्रकरणापर्यंतची वाझेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. जेलमधल्या रवी पुजारींच्या स्टेटमेंटवरुन चौकशी झालीय. पुजारीलाही या प्रकरणात काही सांगायचे आहे, असं मी ऐकून आहे. त्यामुळे अजून कुणाच्या हत्या झाल्यायेत का? याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नारायण राणेंनी केली होती. (navneet rana demands president rule in Maharashtra)

संबंधित बातम्या:

देशमुखांना बदललं जाणार की पोलीस आयुक्तांना?; वाचा, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया

वाझेंची भूमिका उघडी पडते आहे पण काझी आणि API होवाळ का रडारवर? वाचा सविस्तर

LIVE | विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 

(navneet rana demands president rule in Maharashtra)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.