पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ‘मेहुलभाई, मेहुलभाई’ बोलत होते, मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? : नवाब मलिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 'मेहुलभाई, मेहुलभाई' बोलत होते, मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 'मेहुलभाई, मेहुलभाई' बोलत होते, मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? : नवाब मलिक
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 3:51 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ‘मेहुलभाई, मेहुलभाई’ बोलत होते, मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय. मोदी जेवढी तत्परता मेहुल चोक्सीला परत आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही? असाही सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे (Nawab Malik criticize Narendra Modi over Mehul Choksi).

नवाब मलिक म्हणाले, “मेहुल चोक्सीला भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु मोदी सरकारकडून 2-3 दिवसांपासून मेहुल चोक्सीला आणण्याचा जोरदार प्रचारही केला जातोय. मेहुल चोक्सीला आणताय ठिक आहे, परंतु नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना कधी आणणार आहात? जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे.”

“मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही, तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता हा प्रश्न उपस्थित करत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना मोदींनी दाखवली ही तत्परता का दाखवली नाही, असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

चोक्सीकडून अपहरणाचा आरोप

दरम्यान, मेहुल चोक्सीने आपलं अपहरण करुन डोमिनिकाला नेल्याचा आरोप केलाय. एंटीगा आणि बारबुदाचे पोलीस प्रमुख एटली रॉडने यांनी हे आरोप फेटाळले. ते म्हणाले, “अपहरणाचा दावा केवळ मेहुल चोक्सीचे वकीलच करत आहेत. पोलिसांकडे याचे कोणतेही पुरावे नाहीत (Mehul Choksi Current Status). डोमिनिका पुोलिसांनी या अपहरणाच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. चोक्सीला डोमिनिका नेण्यात एंटीगा पोलिसांचा कोणताही सहभाग नाही.”

मेहुल चोक्सी भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा मामा आहे. हे दोघेही 13 हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत.

हेही वाचा :

Mission Choksi: मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी, डोमिनिकामध्ये 8 सदस्यीय टीम दाखल

अनेकांना गंडवणारा मेहुल चोक्सी हनी ट्रॅपमध्ये अडकला? मिस्ट्री गर्लमुळे गूढ वाढलं

PNB Scam भारतातून पळाल्यावर मेहुल चोक्सीने एंटीगाच्या विरोधी पक्षनेत्यांना लाच दिली, पंतप्रधान ब्राउन यांचा गंभीर आरोप

व्हिडीओ पाहा :

Nawab Malik criticize Narendra Modi over Mehul Choksi

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.