आधी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह टीव्हीवर सर्वांसमोर लस टोचावी, मग मी लस घेणार : प्रकाश आंबेडकर
सर्वप्रथन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर लस टोचावी", अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर केली आहे (Nawab Malik on Corona Vaccination).
मुंबई : “कोरोना लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सर्वप्रथन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर लस टोचावी”, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर केली आहे (Nawab Malik on Corona Vaccination).
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
“कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. पण या लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे सर्वप्रथम पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर ही लस टोचून घ्यावी. त्यानंतर मी ती स्वतः घ्यायला तयार आहे. यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (11 जानेवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी कोरोना लसीकरणाच्या मोहीमेविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. तेव्हा मोदींनी येत्या 16 तारखेपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले.
पंतप्रधानांनी आधी लस टोचावी, नवाब मलिकांची मागणी
प्रकाश आंबेडक यांच्याआधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी लस टोचावी, अशी मागणी केली आहे. ते आज पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. कोरोना लसीच्या सुरक्षिततेविषयी अद्याप काही शंका आहेत. या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वप्रथम लस टोचून घ्यावी, असं ते म्हणाले होते.
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
कोरोना लसीकरणासाठी जय्यत तयारी
महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून सीरम कंपनीतून देशाच्या अन्य भागांत लसीची वाहतूक केली जाणार आहे. त्यासाठी कंपनीकडून तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ट्रक्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेड ही कंपनी गेल्या 12 वर्षांपासून या क्षेत्रात आहे. या कंपनीच्या अत्याधुनिक ट्रक्समध्ये उणे 25 अंश ते + 25 अंश सेल्सिअस यादरम्यान तापमान नियंत्रित करण्याची सुविधा आहे. तसेच प्रत्येक ट्रक हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.
सीरम इन्स्टिट्यूटमधून उद्या पहिली लस रवाना होणार
पुण्याच्या सीरम इन्स्टि्ट्यूटमध्ये कोव्हिशील्ड लसीची निर्मिती करण्यात येत आहे. उद्या पहाटे ‘सीरम’मधून लसीची पहिली खेप रवाना होणार अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारने सीरम इन्स्टि्यूटटला लसींसाठी ऑर्डरही दिली आहे. त्यानुसार भारत सरकारला लसीच्या एका कुपीसाठी 200 रुपये मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा : राम कदमांमुळे भाजपची पुन्हा पुन्हा डोकेदुखी?