देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख नाही, वानखेडेंकडे पंचनामा मागा: नवाब मलिक यांचा पलटवार

देवेंद्र फडणवीस समीर वानखेडे तुमचा निकटवर्तीय आहे. त्याच्याकडून पंचनामा मागवा. माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडलं नाही. मी तो पंचनामा दाखवणार आहे. 14 जानेवारीला नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. माध्यमांची फसवणूक करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख नाही, वानखेडेंकडे पंचनामा मागा: नवाब मलिक यांचा पलटवार
देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 9:57 AM

मुंबई: नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. काल मी जयदीप राणासंदर्भातील काही माहिती समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जयदीप राणा एका गाण्याचा फायनान्स हेड होता. कालपासून मी कुणाच्या बायकोला टार्गेट करत असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, गेल्या 26 दिवसात मी कुणाची आई, बहीण आणि पत्नीचा उल्लेख केला नाही. दोन महिलांचा उल्लेख केला कारण त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध होता.  जे लोक महिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना मी प्रश्न विचारत आहे. दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? किरीट सोमय्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या आई-बहिणीविषयी बोलतात. किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्या पत्नीविषयी बोलले. एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात जावं लागलं. किरीट सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी विषयी बोलतात. भाजपनं राजकारणाचा स्तर खालवला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाही, त्यामुळे माफी मागावी, असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी

देवेंद्र फडणवीस समीर वानखेडे तुमचा निकटवर्तीय आहे. त्याच्याकडून पंचनामा मागवा. माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडलं नाही. मी तो पंचनामा दाखवणार आहे. 14 जानेवारीला नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. माध्यमांची फसवणूक करण्यात आली. देवेंद्र फडणवीस तुम्ही वकील आहात, तुमच्याकडं सनद आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत सहा महिन्यात चार्जशीट फाईल करायची असते. केस कमजोर करण्यासाठी आरोप प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय, मात्र चार्जशीट झाल्यानं केस कमजोर होण्याचा प्रश्न नाही. देवेंद्र फडणवीस माफी मागणार का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

जनतेच्या प्रश्नावर राजीनामा एकदा नाहीतर शंभर वेळा द्यायला तयार असल्याचं नवाब मलिक म्हणाले. कोर्टाच्या आदेशाच्या अवमानप्रकरणी त्यावेळी राजीनामा दिले होता. मी 2008 ला पुन्हा मंत्री झालो. देवेंद्र फडणवीस यांना माझा थेट सवाल आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाचं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी नकली देवेंद्र शहरात कोण फिरतंय हा सवाल केला होता. तुमचा भाऊ शहरात काय करत होता याची माहिती दिली होती. आम्ही त्यावेळी सीसीटीव्ही दिलं असतं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप करताय. एखादा व्यक्ती, नेता अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्याऐवजी कारवाई करायला पाहिजे होती, असं नवाब मलिक म्हणाले.

समीर वानखेडेंनी प्रायव्हेट आर्मी तयार केल्याचा आरोप

फोर सिझन हॉटेलमध्ये लगातार पार्टीचं आयोजन करण्यात येत असायचं. त्या पार्टीचा आयोजक कोण होता. त्यापार्टीच्या एका टेबलाची किंमत 15 लाख रुपये होती. रात्र भर जल्लोष सुरु राहायचा. 15 कोटी रुपयांच्या पार्टीचा आयोजक कोण होता. याची तुम्हाला माहिती नव्हती. सरकार बदलल्यावर पार्टी बंद झाली. तुम्हाला त्याची माहिती नव्हती का?असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

जावयाच्या प्रकरणी साडे आठ महिने मी बोललो नाही. गेल्या महिन्यात 13 तारखेला कोर्टाची ऑर्डर समोर आली. आम्ही न्यायालयीन लढू. समीर वानखेडे जेव्हा या विभागात आला त्यावेळी त्यानं प्रायव्हेट आर्मी तयार केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. किरण गोसावी, मनिष भानुशाली, फ्लेचर पटेल, आदील उस्मानी,सॅम डिसुझा, इलू पठाण हे नवाब मलिकांच्या प्रायव्हेट आर्मीचे सदस्य आहेत. समीर वानखेडे यांच्यामार्फत हजारो कोटी रुपयांची वसुली झाली आहे. प्रभाकर साईल यानं 25 कोटींच्या डीलचा आरोप करण्यात आला. 18 कोटी रुपयांवर डील होणार होती, असं म्हटलं. सॅम डिसुझानं डील झाल्याचं कबूल केलं. वानखेडे यांनी पूर्ण फर्जीवाडा रचला. आम्ही पहिल्या दिवसांपासून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभं केलंय.

15 ऑगस्ट 2020 रोजी समीर वानखेडे आल्यानंतर एक गुन्हा नोंद करण्यात आला. सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांना चौकशीला बोलवण्यात आलं. 14 महिन्यापासून चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही. याच केसच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये वसूल करण्यात आलं आहे. मालदीवमध्ये यासंदर्भात डील झालं. वानखेडेंची बहिण दुबईला गेली. एनसीबीचे अधिकारी माध्यमांसमोर येतात त्यांचे शर्ट 500 रुपये किमतीचे आहेत. समीर वानखेडे यांचा शर्ट 70 हजार रुपयांचा असतो. समीर वानखेडे नरेंद्र मोदींच्या पुढचे निघाले. समीर वानखेडे यांनी हजारो कोटी रुपयांची वसुली केली, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

Maharashtra Election Results 2021 LIVE Counting: पहिल्या फेरीत जितेश अंतापूरकर आघाडीवर, 1624 मतांचं लीड

Deglur bypoll Result | देगलूरमध्ये पुन्हा काँग्रेस, भाजपला धोबीपछाड ? वाढलेल्या मतदारांचा कल महत्त्वपू्र्ण ठरण्याची शक्यता

Deglur By Election Voting | देगलूर पोटनिवडणुकीसाठी 64 टक्के मतदान, आता उमेदवारांची धाकधूक वाढली, कौल कोणाला ?

Nawab Malik gave answer to Devendra Fadanvis not drugs found at son in law home and gave challenge read Panchanama from Sameer Wankhede

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.