मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते ! नवाब मलिक यांचं सूचक ट्विट, पत्रकार परिषदेत कोणता धमाका?

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज देखील एक सूचक ट्विट केलं आहे. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मलिक यांनी हे सूचक ट्विट केलंय.

मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते ! नवाब मलिक यांचं सूचक ट्विट, पत्रकार परिषदेत कोणता धमाका?
Nawab Malik
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 10:35 AM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज देखील एक सूचक ट्विट केलं आहे. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मलिक यांनी हे सूचक ट्विट केलंय. माझं बोलणं बंद केलं तरी देखील माझ्या ध्येयाला आणि लढ्याला तुम्ही बंद करु शकत नाही, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलंय.

नवाब मलिक यांचं ट्विट

नवाब मलिक यांची आज दुपारी पत्रकार परिषद

नवाब मलिक यांनी गेल्या महिनाभरापासून पत्रकार परिषद घेत एनसीबीची कारवाई, समीर वानखेडे आणि ड्रग्ज संदर्भातील कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. नवाब मलिक यांनी त्यासोबत ट्विटची मालिका देखील सुरु ठेवली होती. नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी कोर्टात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केलाय. नवाब मलिक यांना न्यायालयानं आज त्यांची भूमिका मांडण्यास सांगितलं आहे. नवाब मलिक आज त्या प्रकरणावर नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिक सोशल मीडियावरुन टार्गेट करतात, ज्ञानदेव वानखेडेंचा दावा

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मलिक रोज सोशल मीडियावरून टार्गेट करत असल्याचं सांगत त्यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीही वानखेडे यांच्या वकिलाने केली आहे. तर वानखेडे यांच्या आरोपावर उद्याच उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने मलिक यांच्या वकिलांना दिले आहेत. नवाब मलिक आज उत्तर दाखल करण्याची शक्यता आहे.

पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला

ज्ञानदेव वानखेडे यांच्या दाव्याववर नवाब मलिक यांच्याकडून जोपर्यंत रिप्लाय फाईल होत नाही, तोपर्यंत मलिक यांनी सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नये. मलिक यांनी क्रांती रेडकर यांच्या बहिणीबाबत एक पोस्ट केली आहे, असं शेख यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. तर, या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्याची विनंती दामले यांनी केली. मात्र, याबाबत उद्याच रिप्लाय दाखल करा असं सांगत कोर्टाने याप्रकरणी 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली. दरम्यान, सोशल मीडियावर मलिक यांना पोस्ट करण्याबाबतचे कोणतेही निर्बंध कोर्टाने लावलेले नाहीत.

इतर बातम्या:

ज्ञानदेव वानखेडेंच्या आरोपांवर उद्याच म्हणणं सादर करा; कोर्टाचे नवाब मलिकांना आदेश

Aslam Shaikh UNCUT PC | पार्टीचं निमंत्रण होतं, पण मी गेलो नाही; मंत्री अस्लम शेख यांचा खुलासा

Nawab Malik live updates tweet and said you should not stop my work with some poetic lines on the defamation notice of Dnyandev Wankhede

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.