मुंबई NCB तील चौकडीला हटवा, कंबोज आर्यनच्या अपहरणाचा मास्टरमाईंड, सगळा खेळ सेल्फीनं फसला, नवाब मलिक यांची स्फोटक पत्रकार परिषद
आर्यन खान तिकीट काढून क्रुझवर गेला नव्हता अपहरण करण्यात आलं होतं. माझी लढाई एनसीबीशी किंवा भाजपशी नसून ड्रग्ज विरोधात असल्याचं नवाब मलिक म्हणाले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आर्यन खान तिकीट काढून क्रुझवर गेला नव्हता अपहरण करण्यात आलं होतं. माझी लढाई एनसीबीशी किंवा भाजपशी नसून ड्रग्ज विरोधात असल्याचं नवाब मलिक म्हणाले. मुंबई एनसीबीमधील चौकडीच्या विरोधात लढाई असून एका अधिकाऱ्यानं माझ्या जावयाकडे गाडी मागितली होती, असंही नवाब मलिक म्हणाले. समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे साथीदार असून ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईड मोहित कंबोज असल्याचं नवाब मलिक म्हणाले.
एनसीबीनं ताब्यात घेतलेल्या तिघांची नावं का लपवली?
आजपासून एक महिन्यापूर्वी म्हणजेच 6 ऑक्टोबरला मी काही माहिती दिली होती. 2 ऑक्टोबरला एनसीबीनं क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर कारवाई करण्यात आली. 3 तारखेला सायंकाळ पर्यंत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. 6 ऑक्टोबरला आम्ही दोन व्यक्तींचा व्हिडीओ जारी केला होता. त्यामध्ये के.पी.गोसावी होता तो आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जात होता. दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली होता तो अरबाझ मर्चंटला एनसीबी कार्यालयात नेत होता. आम्ही पत्रकार परिषद घेत सवाल उपस्थित केला होता की हाय प्रोफाईल केसमध्ये हे लोक आरोपींना आत नेताना दिसत होते. आमची पत्रकार परिषद झाल्यानंतर 5 वाजता एनसीबीच्या ज्ञानेश्वर सिंग यांनी उत्तर दिलं होतं. ज्ञानेश्वर सिंग यांनी ते आमचे स्वतंत्र साक्षीदार असल्याचं उत्तर दिलं. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी माझ्या जावयाच्या कारवाईच्या संदर्भामुळं माझे आरोप पूर्वग्रहदुषित असल्याचा आरोप केला होता, असं नवाब मलिक म्हणाले.
पुन्हा आम्ही पत्रकार परिषद घेतली. त्यापत्रकार परिषदेत समीर वानखेडे यांचा व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये समीर वानखेडे हे आठ ते दहा लोक असल्याचं म्हणतं होते. एक अधिकारी स्पष्टपणे किती जणांना ताब्यात घेतलं का ते सांगत नव्हते असा सवाल केला. रिषभ सचदेव आणि इतर दोघांना सोडण्यात आलं, हे सत्य आम्ही मांडलं. त्यानंतर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत 14 जणांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं. मात्र, त्यांनी नावं सांगितली नाहीत. तीन जणांची नावं जाहीर नावं करण्यामागं मोठा खेळ आहे.
मोहित कंबोजचा अकराशे कोटींचा घोटाळा
मोहित कंबोज यानं अकराशे कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तो काँग्रेस सोडलेल्या आणि कृपाशंकर सिंह यांच्या मागे मागे फिरायचा. मोहित कंबोजनं देशातील सरकार बदलल्यावर तो भाजपमध्ये गेला. मोहित कंबोज यानं भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली तिथं त्याचा पराभव झाला, त्यानंतर त्याला भाजयुमोचं पद दिलं गेलं. मोहित कंबोजवर ईडी आणि सीबीआयची केस आहे. गेल्या वर्षी मोहित कंबोजच्या घरी 60 कोटी रुपयांप्रकरणी सीबीआय़नं छापा टाकला.
हे पूर्ण प्रकरण अपहरणाचं आणि खंडणीचं
आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत गेला नाही. त्याला बोलावलं गेलं. प्रतिक गाभा आणि आमिर फर्निरचरावाला यानं बोलावलं. हे किडनॅपिंगचं प्रकरण होतं. कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. डील 18 कोटी रुपयांची झाली त्यापैकी 50 लाख उचलले गेले. किडनॅपिंगचा मास्टर माइंड हा मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो १२ हॉटेल चालवतो. मोहित कंबोज हा समीर वानखेडेंचा साथीदार आहे. कंबोज आणि वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत. मोहित कंबोज आपले हॉटेल चालवण्यासाठी समीर वानखेडे यांच्या मार्फत कुणाल जानी बास्किन नावाचं हॉटेल चालवतो तिथं बाजूला मोहित कंबोज यांनी तिथं ओपा नावाचं हॉटेल काढलं त्या कुणाल जानी यांच्यावर फर्जीवाडा करत कारवाई करण्यात आली.
समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांची ओशिवारामध्ये भेट
मोहित कंबोज आणि वानखेडे यांचे संबंध आहेत. समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्या भेटीचा व्हिडीओ आहे. तो लवकरचं जाहीर करणार आहे. वानखेडे यांचं नशीब चांगल आहे. माझी प्रेस कॉन्फरन्स 6 तारखेला झाल्यानंतर वानखेडे आणि मोहित कंबोज यांची भेट 7 तारखेला ओशिवारामध्ये झाली. स्थानिक लोकांनी सांगितलं की एक गाडी आली होती, त्यात काही बॉडीगार्ड होते. यांचं नशीब चांगलं होतं. पोलिसांचा सीसीटीव्ही बंद होतं. त्यामुळे त्यांच्या मीटिंगचं फुटेज आम्हाला मिळालं नाही. मात्र, वानखेडे यांनी पोलिसात पाठलाग होत असल्याची तक्रार केली.
प्रायव्हेट आर्मी आहे त्याचा कंबोज हा एक खेळाडू आहे. वानखेडे या शहरात ड्रग्जचा धंदा सुरु राहावा यासाठी खेळ सुरु आहे. ड्रग्ज माफियाला संरक्षण दिलं जावं, त्यांच्याकडून वसुली केली जावी. कोण ड्रग्ज घेत, फिल्म जगतातील कोण ड्रग्ज घेत याची माहिती घेऊन हजारो कोटींची कमाई केली जाते. आर्यन खान प्रकरणात 25 कोटी रुपये मागितले गेले ते प्रकरण 18 कोटींवर सेटल झालं. मात्र, एका सेल्फीनं खेळ संपला, असं नवाब मलिक म्हणाले. 18 कोटी रुपयांचं प्रकरण समोर आलं आहे. प्रभाकर साईल यानं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. मात्र, वानखेडे यांच्या बचावासाठी सॅम डिसुझा याचा वापर केला जातोय.
सॅम डिसुझा याचा व्हिडीओ कंबोज यांनं दाखवला. सॅम डिसुझानं एका टेलिव्हिजन चॅनेलवर एनसीबी आणि समीर वानखेडे यांना क्लिन चीट दिली. 22 तारखेला प्रभाकर साईल याचा व्हिडीओ समोर आला. त्यामध्ये त्यांनं सर्व माहिती दिली. त्यावेळी वानखेडे आणि प्रायव्हेट आर्मीनं प्रभाकर साईल माझ्यातर्फे हे चालवलं जात असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, तसं नव्हत असं नवाब मलिक म्हणाले.
रिपब्लिकन गटाचे नेते मनोज संसारे यांनी के.पी.गोसावी आणि त्याचा साथीदार सरेंडर होणार असल्याचं सांगितलं. ही माहिती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. मुख्यमंत्र्यांनी डीजीपी पांडे यांना माहिती दिली. त्यानंतर पांडे यांनी पुणे आणि पालघर येथील पोलिसात गुन्हा नोंद आहे, रात्री आल्यास त्याला अटक करणार आहोत. पालघरच्या एसपींची टीम मुंबईत आली. मात्र, के.पी.गोसावी आला नाही. 23 ऑक्टोबरला मनोज संसारे एका व्यक्तीला माझ्याकडे घेऊन आला. मला वाटलं की हा व्यक्ती मनीष भानुशाली असेल, असं वाटलं. मात्र, ती व्यक्ती वेगळीचं होती. त्या व्यक्तीनं यासंदर्भातील माहिती दिली. त्यावेळी त्या व्यक्तीचा फोन वाजत होता. मी त्यांना फोन उचलण्यास सांगितलं. त्यांना वारंवार फोन येत होते. आम्ही सोलापूरहून निघालो त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं. स्टेटमेंट घेण्यात आलं आणि सोडण्यात आलं. क्राईम ब्रांच त्यांना ट्रॅक करत होती. ते प्रभाकर साईल माझ्या पर्यंत किंवा मनोज संसारे पर्यंत पोहोचले की नाही याची माहिती घेत होते. त्यानंतर मी त्याला व्हिडीओ रेकॉर्ड, प्रतिज्ञापत्र आणि तक्रार करण्यास सांगितलं.
लढाई भाजपविरोधात नाही
माझ्याकडे विजय पगारे चार दिवसांपूर्वी आले होते. त्यांची मुलाखत वाहिन्यांवर सुरु आहे. पगारे यांनी मनीष भानुशाली त्या हॉटेलवर काय करत होता हे सांगितलं. मी ललित हॉटेल संदर्भात ट्विट केल्यानंतर वानखेडे यांच्यातर्फे मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत सुनील पाटील वर टीका केली. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. कंबोजचं राणासाहब मंत्र्यासोबत फोटो फिरत आहेत. अमित शाह यांच्यासोबतचे फोटो, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो फिरत आहेत. मनीष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो आहेत.मनीष भानुशाली हा ज्योतिरादित्य शिंदे याच्या पक्ष प्रवेशावेळी ते भाजपच्या कार्यालयात मुलाखत देत होते.
6 ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेनंतर दोन तासांनतर सुनील पाटील याचा फोन आला. प्रत्यक्ष येऊन भेटण्यास सांगितलं. दुसऱी पत्रकार परिषद घेतल्यानंतर पुन्हा पाटीलचा फोन आला होता. मात्र, तो आला नाही. विजय पगारे आल्यानंतर भंगाळे याच्या फोनवर सुनील पाटील बोलला पण तो आला नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
सॅम डिसुझाला अटक का नाही?
एक केस झाली होती. वीड बेकरी केस होती त्यात सचिन टोपे पती पत्नीला अटक करण्यात आली होती. त्यात 5 जणांना अटक करण्यात आली होती. पाचवा आरोपी सॅम डिसुझा आहे. सॅम डिसुझाच्या फोनवरुन सचिन टोपेच्या पत्नीला पैसे पाठवण्यात आल्याची लिंक आहे. सॅम डिसुझाला 23 जूनला नोटीस देण्यात आली. नवाब मलिक यांनी एनसीबीचं समन्स दाखवलं. 23 जून पासून सॅम डिसुझाला अटक का करण्यात आली नाही. व्हिडीओत सॅम डिसुझा एनसीबीला क्लिन चिट दिली आहे.
आर.के.बी. राजीव बजाज आणि अॅड. प्रदीप नंबियार हे बोगस पत्रकार या शहरात असून ते समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचे सदस्य आहेत. नावब मलिक यांनी नंबियार आणि सॅम डिसुझा यांच्यातील चॅट दाखवलं. सॅम डिसुझानं हवालामार्फत दिल्लीला पैसे पाठवले. डिसुझानं पावती मागतली असता, हवालाची पावती मिळते का सांगितलं. आर.के.बी. बजाज आणि अॅड. प्रदीप नंबियार हे युट्युब चॅनेल चालवतात. ते धमकी देतात आणि एनसीबीचा धाक दाखवून पैसे वसूल करतात. यावेळी नवाब मलिक यांनी नंबियार आणि आर.के.बी.बजाज यांचा व्हिडीओ दाखवला.
चौकडीला एनसीबीतून हटवा
रुबिना नावाची ड्रग्ज पेडलर आहे तिच्याकडे पैसे मिळाल्यानंतर केस झाली. अजमल कासम शेख, अजमल तोतला याच्यासाठी पैसे अॅडव्हान्स घेण्यात आले. वानखेडे यांची आर्मी या सगळ्यांकडून पैसे वसूल करते. समीर वानखेडे यांनी या शहाराला पाताळ लोक बनवलं आहे. मी एनसीबी, मी भाजप विरोधात लढत नाही. मी चुकीच्या लोकांविरोधात लढत आहे. या शहरात ड्रग्ज पेडलर धंदा करत आहेत. नशेचा धंदा करुन मोठ्या लोकांना टार्गेट करत आहेत.
एक महिना आणि दोन दिवस झाले या प्रकरणाच्या बातम्या येत आहेत. मी एनसीबीच्या डीजींनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते म्हणाले सुमद्रामध्ये एनसीबीनं भारताच्या इतिहासात पहिल्यांदा कारवाई केली. मात्र, तशी कारवाई झाली नाही. आर्यन खानचं अपहरण करण्यात आलं. डील झाली मात्र एका सेल्फीनं घोळ केला.
माझं भाजपला आव्हान आहे की, ही राजकीय लढाई नाही. ड्रग्ज संपूर्णपणे संपलं पाहिजे. छोट्यापासून मोठ्या लोकांपर्यत कारवाई करा. ड्रग्ज प्रकरण संपवून टाकायचं आहे. भ्रष्ट लोकांना पाठिंबा द्यायला नको. मनीष भानुशाली, सुनील पाटील, हे पक्षाच्या नेत्यांच्या जवळ जाऊन गैरफायदा घेतात.
सत्य बाहेर यायला हवं
बातमी आली आहे की, सहा प्रकरणांचा तपास आता संजय सिंह यांना देण्यात आला आहे. समीर वानखेडे यांना बाजूल करण्यात आलं. संजय सिंह यांच्याकडे समीर खान आणि आर्यन खानचं प्रकरण देण्यात आलंय. वानखेडे म्हणत आहेत समीर खान यांचा जामीन रद्द करावा. गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीतून आलेल्या रिपोर्टला एनसीबीनं एनडीपीएसनं चॅलेंज केलं. देशात हे पहिल्यांदा घडलं. मी समीर खान यांच्याशी बोललो त्यांनी लढाई सुरु ठेवण्यास सांगितलंय. चांडाळ चौकडी मुंबईच्या एनसीबी ऑफिसमध्ये आहेत.व्ही. व्ही. सिंग. समीर वानखेडे, आशिष रंजन आणि वानखेडेंचा ड्रायव्हर माने यांना बाजूला करा. या प्रकरणी दोन एसआय़टी स्थापन केल्या आहेत. अपहरण आणि खंडणीवसुली प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. प्रभाकर साईल, के.पी.गोसावी, मनीष भानुशाली, समीर वानखेडे असो सत्य बाहेर यायला हवं.
शाहरुख खानला धमकावलं जात आहे. जे विक्टीम आहेत त्यांना आवाहन त्यांनी पुढं यावं. ही लढाई या पुढं जाईल. अतिंम लढाईच्या शेवटपर्यंत माध्यमांची साथ पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले. माझ्या जावयाकडे आशिष रंजन यांनी रेंज रोव्हर यांनी मागितली होती. पुजा दादलानी यांचं प्रकरण यात आलं आहे. 50 लाख दिले असल्यास ते गुन्हेगार नाहीत, तुम्ही विक्टीम आहात, पुढं या घाबरु नका, असं नवाब मलिक म्हणाले. वानखेडे यांचे फोन सिग्नलवरुन जातात महिलांना घाबरवतात. व्हिलन जोपर्यंत तुरुंगात जात नाही तोपर्यंत लढाई सुरु राहिल, असं नवाब मलिक म्हणाले.
ललित हॉटेलमध्ये सुनील पाटील याच्या नावानं रुम बुक होती. तिथं काय होत होतं त्यामध्ये पडायचं नाही. त्या हॉटेलमध्ये मुली येत होत्या. ड्रग्ज घेतलं जात होतं. कंबोजनं कालचं स्वत:च माहिती दिली.
26 प्रकरणांची चौकशी व्हावी
संजय सिंह यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही. आर्यन खान आणि समीर खान यांचं प्रकरण त्यांच्याकडे देऊन घाबरावयाचा प्रयत्न झाल्यास मी घाबरणारा नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
एनसीबीनं ड्रग्ज पार्टीत पेपर रोल जप्त केला. तो रोल फॅशन टीव्हीचा आहे. काशिफ खान याला का सोडून देण्यात आलं. तो काशिफ खान अस्लम शेख यांना पार्टीत येण्यासाठी का जबरदस्ती का करण्यात आली होती. मंत्र्यांच्या मुलांना का फोर्स करण्यात येत होतं, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. ही राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यातील लढाई नाही. एनसीबीमध्ये बसलेल्या चार लोकांची चौकशी करा, त्यांना बाहेर काढा. काही जण माझ्यावर प्रश्न उपस्थित करतात. एमडीचा समावेश ड्रग्जमध्ये व्हावा म्हणून मी प्रयत्न केले. ड्रग्ज संपवावं यासाठी प्रयत्न करतोय, असं नवाब मलिक म्हणाले.
मोहित कंबोजचा भाचा रिषभ सचदेव आहे. आर्यन खानचे दोन मित्र प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या मार्फत आर्यनला नेण्यात आलं. 27 ऑक्टोबरला फॉर्च्युन हॉटेलमध्ये पार्टी झाली.याचा मास्टरमाईंड हा मोहित कंबोज आहे, असं नवाब मलिक म्हणाले. मी काही माहिती दिली आहे, समीर वानखेडे यांनी माझ्याविरोधात तक्रार केलीय, ही लोकशाही आहे. माझ्या बोलण्यावर बंदी घालण्यासाठी हायकोर्टात देखील गेले होते.
इतर बातम्या:
नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा, समीर वानखेडेंच्या वडिलांकडून 1.25 कोटींची मागणी
मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप
Nawab Malik Press Conference today said Mohit Kamboj is Mastermind of Aryan Khan kidnapping and ransom case demanded removal of Sameer Wankhede from NCB