फडणवीस म्हणाले, डुकरासोबत कुस्ती, आता मलिक म्हणतात, इन्सान इन्सान होता है!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर पलटवार करताना डुकरासोबत कुस्ती करून घाण अंगाला लावून घ्यायची नाही, अशी टीका केली होती. (nawab malik reply to devendra fadnavis to tweet post)

फडणवीस म्हणाले, डुकरासोबत कुस्ती, आता मलिक म्हणतात, इन्सान इन्सान होता है!
देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 11:55 AM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर पलटवार करताना डुकरासोबत कुस्ती करून घाण अंगाला लावून घ्यायची नाही, अशी टीका केली होती. नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. इन्सान, इन्सान होता है, असं म्हणत नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बर्नाड शॉचा सुविचार पोस्ट करून मला प्राण्याची उपमा दिली. त्यात काही नवीन नाही. भाजपचे नेते असेही लोकांना कुत्रे, मांजर म्हणत असतात. यातून त्यांची संस्कृती दिसून येते. ते लोकांना माणूस म्हणून वागवत नाहीत हेच स्पष्ट होतं, असं सांगतानाच इन्सान… इन्सान होता है हे यांना कळतच नाही, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

राऊतांनीही घेरलं

फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या सुविचारावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही फडणवीसांवर टीका केली. मी त्याबाबतचं एक ट्विट केलं आहे. पण मी बर्नाड शॉचा दाखला दिला नाही. आम्ही कुसुमाग्रज वाचतो. वसंत कानेटकर वाचतो. आम्ही आपले मराठी साहित्य वाचतो. बर्नाड शॉ अधूनमधून चाळत असतो. बर्नाड शॉचा दाखला विरोधी पक्षनेत्याने दिला वाटतं. ठिक आहे. चांगलं आहे. महाराष्ट्राला वाचनाची मोठी परंपरा आहे. बर्नाड शॉ महान नाटककार साहित्यिक होते. त्यांचा दाखला दिल्याने आपले लोकं वाचायला लागले. त्याचं स्वागत आणि कौतुक केलं पाहिजे. त्यामुळे नाशिकचं साहित्य संमेलन अधिक बहारदार होईल. चिखलात कोण लोळतंय, चिखलफेक कोण करतंय आणि चिखलफेकीची सुरुवात कुठून झाली हे राज्याची जनता जाणते. काल मुख्यमंत्र्यांनीही कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांच्या पाठीशी राहिल्याने मलिकांच्या लढाईला नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे, असा हल्ला राऊत यांनी लगावला.

फडणवीस काय म्हणाले होते?

फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना अभय दिलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं, असा आरोप केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नाड शॉ यांचा सुविचार पोस्ट करत मलिकांना प्रत्युत्तर दिलं होतं. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणइ डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

VIDEO: रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल

मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक

Nawab Malik PC Live : बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

(nawab malik reply to devendra fadnavis to tweet post)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.