मुन्ना यादव, हैदर आझम ते फडणवीसांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ, नवाब मलिकांकडून हल्लाबोल
महारष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. समीर वानखे़डे, मुन्ना यादव, हैदर आझम आणि बनावट नोटा प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.
मुंबई: महारष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. समीर वानखे़डे, मुन्ना यादव, हैदर आझम आणि बनावट नोटा प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ सुरु असल्याचा आरोप नवाब मलिकांनी हल्लाबोल केलाय.
काल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर काही आरोप केले होते. त्याचा कालचं खुलासा केला होता त्याची अधिक माहिती मी देत आहे. तुम्ही मंत्री असताना सलीम पटेल यांच्याविषयी माहिती होती का नव्हती असं फडणवीसांनी विचारलं मात्र, 2005 मी मंत्री नव्हतो, असं नवाब मलिक म्हणाले. आर.आर. पाटील यांच्यासोबत व्हिडीओ व्हायरल झाला होता असा सवाल तुम्ही विचारला. त्यानंतर सलीम पटेल यांनी त्यावेळी दाऊद सोबत संबंध असल्याच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांवर मानहानीचा दावा दाखल केला होता. सलीम पटेलचं गेल्या पाच महिन्यापूर्वी मृत्यू झालाय.
सरदार वली खान यांच्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले. मात्र, 2005 मध्ये त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला नव्हता. सरादर शहावली खानच्या मुलानं 300 स्के.फुटवर नाव चढवलं होतं. त्या जागेचा व्यवहार केला होता. देवेंद्र फडणवीस मी जी लढाई लढतोय, किंवा लढत आहे. एनसीबीनं निर्दोष लोकांना फसवलं जाण्याचा विषय, हजारो कोटींच्या खंडणी वसुलीचं प्रकरणावरुन दुसरीकडं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. देवेंद्र फडणवीसांचे आणि त्या अधिकाऱ्याचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी 2008 मध्ये सेवेत येतो 14 वर्षांपासून मुंबई सोडत नाही या मागचं गणित काय? असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
मुन्ना यादव तुमच्या गंगेत पवित्र झाला का?
देवेंद्र फडणवीस इतरांवर अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप करत आहेत. मात्र,अंडरवर्ल्डचे लोक, ज्यांचे संबंध आहेत, गुन्हेगार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्या लोकांना सरकारी कमिशन आणि बोर्डांचं अध्यक्ष का बनवलं?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मुन्ना यादव नावाचा व्यक्ती नागपूरचा गुंड आहे. तो आपला राजकीय दबाव करणारा साथीदार आहे. त्याला आपण कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष बनवलं होतं की नाही. मुन्ना यादव तुमच्या गंगेत पवित्र झाला होता की नव्हता?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
हैदर आझम नावाच्या आपल्या नेत्याला मौलना आझाद वित्तीय महामंडळाचा अध्यक्ष केलं होतं की नव्हतं? हैदर आझम बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आणण्याचा प्रयत्न करतो की नाही. हैदर आझमची दुसरी पत्नी बांग्लादेशी आहे. ज्याची चौकशी बंगाल पोलिसांनी सुरु केली. बंगाल पोलिसांनी जन्मदाखले आणि इतर कागदपत्रे खोटी असल्याची माहिती होती. मालाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असताना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात तुमच्या आदेशानं वसुली सुरु होती. मुंबईत आणि बिल्डरांकडून वसुली केली जात होती की नव्हती? तुमच्या काळात विदेशातून लोकांना फोन येत नव्हते का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
मोदींनी नोटबंदी जाहीर केली. पंजाब, मध्यप्रदेशात खोट्या नोट्या पकडल्या जात होत्या. मात्र, 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात बनावट नोटांचं एकही प्रकरण उघडकीस आलं नाही. तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामुळं बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरु होता. 8 ऑक्टोबर 2017 डायरेक्टर इंटेलिजन्स रेव्हेन्यूनं बीकेसीमध्ये छापेमारी केली. 14 कोटी 56 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. ते प्रकरण रफादफा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये मदत करण्याचं काम केलं होतं.
पाकिस्तान, दाऊद आयएसआय व्हाया बांगलादेश मार्गे भारतात बनावट नोटा पसरवल्या जातात. 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा होत्या. पुण्यात आलम शेखला अटक झाली. रियाझ शेख आणि नवी मुंबईत अटक झाली होती. 14 कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण 8 लाख 80 हजार रुपयांचं प्रकरण सांगून दाबण्यात आलं. पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात चालतात. गुन्हा नोंद होतो आणि काही दिवसात जामीन होतो. प्रकरण एनआयएला दिलं जातं नाही, कारवाई होत नव्हती कारण त्यावेळच्या सरकारचा पाठिंबा होता. काँग्रेसचा नेता असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, तो काँग्रेसचा नेता नव्हता. हाजी अरफाक शेखला अल्पसंख्याक आयोगाचं अध्यक्ष केलं होतं त्यांचा हा भाऊ आहे.
रियाझ भाटी कोण?
आमचा तुम्हाला सवाल आहे की रियाझ भाटी कोण आहे. 29 ऑक्टोबरला रियाझ भाटी बनावट पासपोर्ट सोबत सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम संबंधाच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. रियाझ भाटी सर्व कार्यक्रमात तुमच्या सोबत का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करायचा नाही. त्यांच्या कार्यक्रमात जायचं असल्यास तपासणी केल्याशिवाय परवानगी मिळत नाही. रियाझ भाटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले. रियाझ भाटीसोबत तुम्ही वसुलीचं काम केलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात वसुलीचा खेळ सुरु होता. देवेंद्र फडणवीसांची काळी कामं तुमच्यासमोर ठेवणार आहे.
अमृता फडणवीसांना इशारा
चोर मचाये शोर यांची काळी संपत्ती काढायची वेळ आली तर ते पण आज ना उद्या काढू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. वरळीत दोनदोनशे कोटींचे कुणाच्या नावाने प्लॅट आहेत. वेळ आली तर ते पण काढू. मी महिलांबद्दल काही बोलू इच्छित नाही, मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
इतर बातम्या:
Nawab Malik slam Devendra Fadanvis over Munna Yadav Haidar Azzam and also said Fadnavis protect fake currency