कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच योगी विरुद्ध मोदींचा दिखावा; नवाब मलिक यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांच्यात तणाव निर्माण झाल्यांच वृत्त आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात तणाव निर्माण झाल्यांच वृत्त आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी खास करून उत्तर प्रदेशातील अपयश झाकण्यासाठीच मोदी विरुद्ध योगी असं चित्रं जाणूनबुजून निर्माण केलं जात आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. (nawab malik slams bjp over showing conflict between modi and yogi adityanath)
नवाब मलिक यांनी मीडियाशी संबोधित करताना ही टीका केली. काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तरप्रदेशमध्ये येत आहेत. परंतु, कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती आहे, असं मलिक म्हणाले. कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपचा पराभव निश्चित
4 वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात द्वेषाचं वातावरण निर्माण केलं. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकही योजना राबवण्यात आली नाही. कोरोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला, असा आरोप करतानाच उत्तरप्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे. मात्र उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे, असंही ते म्हणाले.
लसीकरणाचा डाटा का लपवायचा?
यावेळी त्यांनी लसीकरणावरही भाष्य केलं. केंद्रसरकार कोरोना लसीकरणाबाबतचा माहितीचा डाटा सार्वजनिक करु नका, असे राज्यांना सांगत आहे. मात्र किती लस आम्हाला दिली आणि किती लसीकरण केले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. हे लोकांपासून का लपवायचे? असा सवाल त्यांनी केला.
माहिती लपवून कोरोनाला हरवू शकत नाही
किती लस आली? किती लोकांना लसीकरण करण्यात आले याची माहिती स्वतः केंद्रसरकारने दर आठवड्याला जाहीर करावी. कुठल्या राज्याला किती लस दिली हे सांगावे. किती लसीकरण केले याची पारदर्शकपणे माहिती द्यावी. माहिती लपवून कोरोनाला हरवू शकत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
अद्याप लसींचा साठा नाही
केंद्रसरकारने 12 कोटी लस पुरवठा जूनपर्यंत देण्याची घोषणा केली होती. 10 दिवस उलटून 11 दिवस उजाडला तरी केंद्रसरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्रसरकार फक्त घोषणा करते त्यावर अंमलबजावणी होत नाही. लस उपलब्ध करण्यात केंद्रसरकार अपयशी ठरले आहे. हे लपवण्यासाठी लसीकरणाचा डाटा सार्वजनिक करू नका. यामुळे मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल असे सांगत आहे. मात्र हे तथ्यहिन असल्याचा दावा त्यांनी केला. (nawab malik slams bjp over showing conflict between modi and yogi adityanath)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 June 2021https://t.co/mOqpKCmBqV
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2021
संबंधित बातम्या:
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक, ‘या’ 5 मुद्द्यांवर खल!
बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं; छगन भुजबळांची वादाला फोडणी?
हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन
(nawab malik slams bjp over showing conflict between modi and yogi adityanath)