नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द करण्यासाठी एनसीबी हायकोर्टात; अडचणी वाढणार?
कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या 27(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. (Sameer Khan)
मुंबई: कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या 27(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, समीर खान यांचा जामीन रद्द व्हावा म्हणून एनसीबीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे समीर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एनसीबीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. समीर खान यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे कोर्ट या प्रकरणावर काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आम्ही समीर खान याचा बेल रद्द करण्यासाठी हायकोर्टात गेलो आहोत. समीर खान यांच्याकडे ज्या वस्तू सापडल्या आहेत. त्या वस्तूंबाबत 10 वर्षाची शिक्षा आहे. समीर खान यांच्या वर आम्ही 27(ए) हे कलम लावलं आहे. त्यांच्याकडे काही सापडलं नाही. मात्र, त्यांनी या व्यवसायासाठी आर्थिक मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. समीर खान यांना जो जामीन देण्यात आला आहे. त्यात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारे तपासाशी संबंधित व्यक्तीवर दबाव आणू नये, असं म्हटलं आहे. मात्र, आता आमच्या अधिकाऱ्यांचा नंबर जाहीर करून हा एक प्रकारे तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करू, अस एनसीबीच्या सूत्रांच म्हणणं आहे.
वानखेडे काय म्हणाले?
प्रकरण कोर्टात आहे. माझा नंबर त्यांनी जाहीर केला हे ठीक आहे. त्यांच्याकडे ड्रग्स सापडलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याबाबत आलेला रिपोर्ट वाचा. त्यांचा जामीन रद्द व्हावा म्हणून आम्ही वरच्या कोर्टात गेलो आहोत, असं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं.
मलिकांनी सांगितला घटनाक्रम
14 जानेवारी रोजी एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. सर्व वृत्तवाहिन्यावर दाखवले गेले की, मोठ्याप्रमाणावर गांजा सापडला. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही मीडियाला खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो होतो की, एनसीबी फर्जीवाडा करुन लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे, असं सांगतानाच करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, समीर खान यांना फ्रेम केले गेले. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणातही असेच झाले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
माझ्या जावयाला फ्रेम केल्यानंतर गेले अनेक महिने आम्ही तणावात होतो. मात्र आमचे नेते शरद पवारसाहेबांनी माझे धैर्य वाढवले. जावयाने काही चूक केली असेल तर त्याची शिक्षा कायदा त्याला देईल, मात्र त्याची शिक्षा सासऱ्यांना देता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती, असेही त्यांनी सांगितले.
8 जानेवारी 2021 रोजी एनसीबीने पत्रकारांना सांगितले की, दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोतून ट्रेस केले गेले. 9 जानेवारी करण सजनानी जे वांद्रे येथे राहतात, त्यांच्या घरी छापा टाकला गेला. एनसीबीने अधिकृत प्रेस नोट काढून 200 किलो गांजा जप्त केल्याची बातमी दिली. त्याच दिवशी 9 जानेवारी रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्याने आपल्या मोबाईल नंबरवरुन प्रेस नोट आणि चार फोटो पाठवले. एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली असल्याचे या प्रेस नोटद्वारे सांगितले. 9 जानेवारी रोजी राहिला फर्निचरवाला नावाच्या मुलीकडे साडे सात ग्रॅम गांजा जप्त केला गेला. त्या मुलीला त्याच दिवशी जामीन मिळाला. याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 12 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता माझे जावई समीर खान यांना समन्स पाठविण्यात आले. 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे दहा वाजता माझे जावई समीर खान एनसीबी कार्यालयात पोहोचले. तिथे आधीपासूनच वृत्तवाहिन्याचे कॅमेर लागलेले होते. सर्व वृत्तवाहिन्यावर माझ्या जावयाचा फोटो लावून ते अंमली पदार्थाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले. अटक झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत एनसीबीने तीन महिने वेळ घालवला. 9 जानेवारी रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईची प्रेस नोट आणि जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे फोटो एनसीबीचे अधिकारी यांच्या XXXXXXXXXX या मोबाईल नंबरवरुन पत्रकारांना फॉरवर्ड करण्यात आले होते. या फोटो आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारावर मीडियाने बातम्या दिल्या. शेवटी कुणीही कितीही बातमी पेरली तरी त्याची खातरजमा पत्रकारांनी केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 14 October 2021 https://t.co/AivafddpNC #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2021
संबंधित बातम्या:
जावयाकडे गांजा सापडलाच नाही, गांजा आणि तंबाखूमधील एनसीबीला फरक कळतो की नाही?; नवाब मलिक यांचा सवाल
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स; राष्ट्रवादीवर संक्रात?
सरकारवर कोणताही दबाव नाही; लवकरच सत्य बाहेर येईल: नवाब मलिक
(NCB approached Bombay HC for cancellation of Nawab Malik’s son-in-law Sameer Khan’s bail)