मुंबईतील ‘मुच्छड़ पानवाला’ला ड्रग्ज प्रकरणी NCB चे समन्स
'मुच्छड़ पानवाला'ला ड्रग्ज पुरवत असल्याचा एनसीबीला संशय आहे. (NCB summons Mucchad Panwala in Drugs case)
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड़ पानवाला‘ (Mucchad Panwala) आता एनसीबीच्या रडारवर आला आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात ‘मुच्छड़ पानवाला’च्या मालकाचे नाव समोर आल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्यांना समन्स पाठवले आहे. त्यामुळे मुंबईतील पानशौकिनांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. (NCB summons Mucchad Panwala in Drugs Supply Case)
मुंबईतील ड्रग्ज तस्करीचे जाळे दिवसेंदिवस पसरत चालले आहे. एनसीबीच्या तपासात दररोज नवनवी नावं समोर येत आहेत. नुकतीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत 200 किलो ड्रग्ज जप्त केले. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री दिया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि एका ब्रिटीश नागरिकाला एनसीबीने बेड्या ठोकल्या होत्या.
एनसीबीच्या चौकशीदरम्यान ‘मुच्छड़ पानवाला’च्या मालकाचे नाव समोर आले. दोन्ही आरोपी ‘मुच्छड़ पानवाला’ला ड्रग्ज पुरवत असल्याचा एनसीबीला संशय आहे. एनसीबी अधिकारी आता दुकानाच्या मालकाची चौकशी करणार आहेत. पानातून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचा आरोप आहे.
दक्षिण मुंबईतील केम्प कॉर्नर परिसरात ‘मुच्छड़ पानवाला’चे दुकान आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक जण या दुकानात पानाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजकही पान खाण्यासाठी ‘मुच्छड़ पानवाला’च्या दुकानात गर्दी करतात.
पानवाल्याच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करीची उदाहरणं याआधीही समोर आली आहेत. ड्रग्ज विक्रीच्या आरोपाखाली मुंबईत आतापर्यंत अनेक पान विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आता ‘मुच्छड़ पानवाला’वर कारवाईची टांगती तलवार आहे.
अर्जुन रामपालच्या बहिणीची चौकशी
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपाल हिला NCB कडून दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर कोमल रामपाल आज NCB कार्यालयात हजर झाली. अर्जुन रामपालच्या घरात सापडलेल्या प्रतिबंधित औषधांप्रकरणात तिची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी समन्स बजावण्यात आलं तेव्हा कोमल रामपाल चौकशीही हजर झाली नव्हती.
संबंधित बातम्या :
अभिनेता अर्जुन रामपालची बहीण NCB कार्यालयात
अर्जुन रामपालची सात तासांच्या चौकशीनंतर सुटका
(NCB summons Mucchad Panwala in Drugs Supply Case)