बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात पुढील आठवड्याभरात आरोपपत्र दाखल होणार?

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल होणार आहे. एनसीबीकडून हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. मुंबई सेशन कोर्टातील विशेष एनडीपीएस कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात पुढील आठवड्याभरात आरोपपत्र दाखल होणार?
सुशांतसिंह राजपूत
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 10:58 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर प्रकर्षाने समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल होणार आहे. एनसीबीकडून हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. मुंबई सेशन कोर्टातील विशेष एनडीपीएस कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात येईल. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात सुशांतसिंगची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, अभिनेत्री दीपिका पदुकोन, अभिनेता अर्जुन रामपाल यांच्यासह अनेक दिग्गजांची चौकशी झाली आहे. या प्रकरणातील 5 आरोपी फरार आहेत.(NCB will soon file a chargesheet in the Bollywood drugs connection case)

14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांतसिंगचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा समोर आल्यानंतर ईडीने तपास सुरु केला. ईडीच्या तपासात सुशांतसिंगला ड्रग्स दिल्याचं उघड झालं. त्यानंतर एनसीबीच्या मुंबई झोनने गुन्हा दाखल केला. हा गुन्हाचा तपास झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. एनडीपीएस या विशेष कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल असल्यास 180 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक आहे. हा गुन्हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल करण्यात आलाय. त्यामुळे 180 दिवस लवकरच पूर्ण होत आहेत.

180 दिवस पूर्ण होण्यापूर्वी एमसीबीला आरोपपत्र दाखल करणं आवश्यक असल्यामुळे एनसीबीचे अधिकारी आरोपपत्र तयार करण्यात व्यस्त आहेत. पुढील आठवड्याभरात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार असल्याचं एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. त्यामुळे बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन बाहेर येईल आणि अनेक हस्ती या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अजून एक आरोपी अटकेत

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात 4 फेब्रुवारी रोजी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याचं नाव जगत सिंग आनंद असं आहे. त्याला कोर्टात हजर केलं असता 8 फेब्रुवारीपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडून नवी काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एनसीबीने 28 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत या प्रकरणी सुमारे 30 पेक्षा जास्त आरोपींना अटक झाली आहे.

रिया चक्रवर्ती अद्याप सावरली नाही

सुशांतसिंह राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही त्याचे फॅन्स सावरले नाहीत. सुशांतच्या निधनानंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक आरोप केले होते. सुशांतच्या निधनाबाबत रियावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे ड्रग्सप्रकरणी रियाला तुरुंगाची हवाही खावी लागली. सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच रियाने एक प्रतिक्रिया दिली आहे, जिममधून बाहेर आल्यानंतर रियाने आपण अद्याप सावरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

NCB will soon file a chargesheet in the Bollywood drugs connection case

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.